Thane News  x
मुंबई/पुणे

Thane News : संतापजनक! ठाण्यात रिक्षाचालकाची मुजोरी, रिक्षामध्ये तरुणीला मारण्याचा प्रयत्न

Thane : शुल्लक कारणावरुन रिक्षाचालकाने एका तरुणीला मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी रिक्षा चालकावर कारवाई केली आहे. घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे.

Yash Shirke

Thane Shocking : ठाण्यातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका किरकोळ कारणावरुन एका तरुणीला मारण्याचा प्रयत्न झाल्याची घटना समोर आली आहे. सदर प्रकार मोबाईलमध्ये कैद झाल्यानंतर पोलिसांनी संबंधित रिक्षा चालकावर कारवाई केली आहे. ठाण्यातील या प्रकारामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

ठाण्यात रिक्षाचालकांची मुजोरी नवीन नाहीये. रिक्षाच्या भाड्यावरुन, तर कधी पैशांवरुन रिक्षाचालक प्रवाशांशी वाद घालत असल्याचे पाहायला मिळत आहे. अशीच एक घटना समोर आली आहे. शुल्लक कारणावरुन रिक्षाचालकाने तरुणीला मारण्याचा प्रयत्न केला. रिक्षामध्ये तिच्याशी बाचाबाची करत वाद घातला. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायर होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, डोबिंवली येथे राहत असलेली श्रुती डोळस आणि मुलुंड येथे राहणारी रुची चव्हाण या दोघी नेहमीप्रमाणे ठाणे रेल्वे स्थानकावरुन रिक्षाने तीन हात नाका येथे जात होत्या. रिक्षाने जात असताना रिक्षा चालकाने त्यांच्याशी हुज्जत घातली. याशिवाय तरुणीला मारण्याचा प्रयत्न देखील केला. तरुणींनी रिक्षाचालकाचा व्हिडीओ काढला.

रिक्षाचालकाने तरुणीशी मारहाण करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना ठाण्यात घडली आहे. शहरातील महिलांच्या सुरक्षेबाबत चिंचा वाढत असताना हा प्रकार समोर आला आहे. काही दिवसांपूर्वी, एका १३ वर्षीय अल्पवयीन तरुणीची हत्या करण्यात आली. या प्रकरणात संशयित व्यक्ती हा ४० वर्षीय रिक्षाचालक होता. या दोन्ही घटनांमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुमंत्रालयातील कॅन्टीनला क्लीनशीट कशी? संजय गायकवाडांचा संताप

3 Gram Mangalsutra Designs: ऑफिस ते रोजसाठी परफेक्ट! ३ ग्रॅमचे लाईटवेट मंगळसूत्र पाहा ट्रेंडी ७ सुंदर डिझाइन्स

Lohagad fort Video : लोहगड किल्ल्यावर पर्यटकांनी केलं धुम्रपान; शिवप्रेमींचा दणका, व्हिडिओ व्हायरल

Abhijeet Dipke Video : पोलीस अधिकाऱ्यांनी आंदोलक मुलींचे कपडे फाडून मारहाण केली; अभिजीत दिपके काय काय म्हणाले?

Accident : लष्करी तळाजवळ भीषण अपघात; मेजरचा जागीच मृत्यू, लेफ्टनंट दर्जाचे २ अधिकारी गंभीर जखमी, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT