Ayodhya Paul Saam Tv
मुंबई/पुणे

Ayodhya Paul: ठाकरे गटाच्या अयोध्या पोळ यांच्यावर शाईफेक

ठाकरे गटाच्या अयोध्या पोळ यांच्यावर शाईफेक

साम टिव्ही ब्युरो

Ayodhya Paul: शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महाराष्ट्र सोशल मीडिया समन्वयक अयोध्या पोळ यांच्यावर शाईफेक झाल्याची घटना घडली आहे. ही घटना कळव्यात घडल्याची माहिती मिळत आहेत.

अयोध्या पोळ यांनी स्वतः फेसबुकवर एक पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली आहे. यासोबतच त्यांनी शाईफेकनंतर त्यांचा फोटोही पोस्ट केला आहे. ''आजोळी आले अन सन्मान झाला,'' असं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, अयोध्या पोळ या कळव्यात एका कार्यक्रमासाठी आल्या होत्या. यावेळी त्यांना काही जणांच्या टोळक्याने घेरले आणि शाईफेक केली, असं सांगण्यात येत आहेत. याबाबत अयोध्या या स्वतः लवकरच माहिती देणार असल्याचं त्यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये सांगितलं आहे.

कोण आहेत अयोध्या पौळ?

शिवसेनेचे हिंगोलीचे आमदार संतोष बांगर यांना आव्हान दिल्यानंतर अयोध्या पोळ या चर्चेत आल्या होत्या. अयोध्या पोळ पाटील या मूळच्या परभणी जिल्ह्यातल्या आहेत. अयोध्या यांनी प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण गावातच पूर्ण केलं. त्यानंतर पदवीपर्यंतचं शिक्षण मुंबईत झालं. गेली 12 वर्षांपासून त्या मुंबईतच राहतात.

अयोध्या यांना लहानपणापासून शिवसेनेचं बाळकडू मिळालं आहे. त्यांच्या आई म्हणजेच गंगूबाई या शिवसेनेच्या पालम तालुका प्रमुख होत्या. बाल शिवसैनिक ते युवा सेना असा त्यांचा प्रवास झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अंजनेरी पर्वतावर हनुमानाचे भव्य मंदिर बनवा, हनुमान जन्मस्थान संस्थेची मागणी

Cabinet Meeting: ऐन निवडणुकीत फडणवीस सरकारच्या मोठ्या घोषणा, मंत्रिमंडळ बैठकीत ६ महत्वाचे निर्णय; वाचा सविस्तर...

Dhurandhar Trailer: अ‍ॅक्शन अवतारात दिसणार बॉलिवूडचे 'धुरंधर'; अंगावर काटा येणारा ट्रेलर, डायलॉग ऐकून कराल कौतुक

Belly Fat Reduce Tips: रोज जिम करून वजन कमी होत नाही, हे घरगुती उपाय करा, पोटाची ढेरी लगेच होईल कमी

Ajit Pawar: फोडलेले नारळ, हळद-कंकू अन् लिंबू...; बारामतीत अजित पवारांच्या घराबाहेर अघोरी पूजा

SCROLL FOR NEXT