Kalyan Shiv Sena Melava: एक मोठी बातमी समोर येत आहे. शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांनी भिवंडी आणि कल्याण लोकसभेच्या सर्व पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलली आहे. भाजप आणि शिवसेना वादाच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला महत्त्व प्राप्त झालं आहे.
हा मेळावा शनिवार सकाळी १०:०० वाजता कल्याण पश्चिम येथील आचार्य अत्रे हॉल या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे. यात शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, महिला आघाडी आणि युवासेनेचे कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, कल्याणमध्ये उद्या हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये स्वतः श्रीकांत शिंदे हे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून कल्याण लोकसभा मतदारसंघात शिवसेना विरुद्ध भाजप, असं शीतयुद्ध रंगल्याचं पाहायला मिळालं होतं.
यातच मानपाडा पोलीस ठाण्यात भाजप पदाधिकारी नंदू जोशी यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर भाजपने आक्रमक पवित्रा घेतला होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांच्यावर श्रीकांत शिंदे यांचा वरदहस्त असल्याचं दबक्या आवाजात भाजप कार्यकर्त्यांकडून बोललं जात होतं. यातच भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. ज्यात स्थानिक पातळीवर शिवसेनेला सहकार्य न करण्याचा निर्णय घेण्यात आला. (Latest Marathi News)
श्रीकांत शिंदे शक्तिप्रदर्शन करणार
यानंतर दोन्ही पक्षातील बड्या नेत्यांकडून हा वाद मिटल्याचे सांगण्यात आलं होतं. मात्र अजूनही स्थानिक पातळीवर कुरघोडी दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर उद्या होतं असलेल्या मेळाव्यात श्रीकांत शिंदे कार्यकर्त्यांना काय आवाहन करणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. या मेळ्याच्या निमित्त उद्या मतदारसंघात श्रीकांत शिंदे हे शक्तिप्रदर्शनही करू शकतात.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.