ncp thane saam tv
मुंबई/पुणे

Thane: निलेश- नितेश जाेडगळीवर गुन्हा दाखल करा; ठाण्यातील NCP ची मागणी

ठाणे राष्ट्रवादी काॅंग्रेसचे कार्यकर्ते आज आक्रमक झाले हाेते.

विकास काटे

ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे (ncp) सर्वेसर्वा शरद पवार (sharad pawar) यांच्यावर केलेले बेछुट आरोप भाजप (bjp) आमदार नितेश राणे (nitesh rane) आणि निलेश राणे (nilesh rane) यांना महागात पडण्याची शक्यता आहे. नितेश राणे व निलेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या (thane ncp) कार्यकर्त्यानी नौपाडा पोलिसांना (police) निवेदन दिले आहे. (ncp latest marathi news)

निलेश राणे यांनी नुकतीच आपल्या नेहमीच्या शैलीत शरद पवार यांच्यावर टीका केली होती. यामध्ये त्यांनी शरद पवार यांचे नाव कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम (dawood Ibrahim) याच्याशी जोडले होते. नितेश राणे यांनी आझाद मैदानातील मोर्चा दरम्यान शरद पवार यांच्यावर टीका केली होती. त्यावेळी त्यांची जीभ घसरली असा आराेप ठाणे राष्ट्रवादी काॅंग्रेसचे कार्यकर्ते करीत आहेत.

नितेश आणि निलेश राणे हे हेतुपरस्पर आमचे नेते शरद पवार यांच्यावर टीका करीत आहेत. त्यांच्याकडे कशाचाही पूरावा नसताना ते बाेलत असल्याने राणे बंधूंवर गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यानी शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्यासह नौपाडा पोलिस ठाण्यात निवेदन दिले. यावेळी राष्ट्रवादीचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते .

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MLC Election: मोठी बातमी! विधानपरिषदेसाठी ठाकरेसेनेकडून यादी जाहीर, कुणाला कुठे मिळाली संधी?

High blood pressure: रोजच्या ताटातले हे 6 पदार्थ वाढवतायत तुमचं ब्लड प्रेशर

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

निवडणूक आयोगाचा भयंकर गोंधळ! पदवीधर मतदार यादीत थेट उद्धव ठाकरेंचे नाव; राजकीय वर्तुळात खळबळ

8th Pay Commission: 2027 मध्ये सॅलरी वाढली तर 2026 च्या पैशांचं काय? 8व्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट

SCROLL FOR NEXT