Thane Marathon News update  Saam tv
मुंबई/पुणे

Thane Marathon News : ठाणे मॅरेथॉन स्पर्धेत सहभाग घेतला; घरी गेल्यानंतर स्पर्धकाचा अचानक मृत्यू

Thane Marathon News update : ठाणे मॅरेथॉन स्पर्धेत सहभाग घेतलेल्या घरी गेल्यानंतर स्पर्धकाचा अचानक मृत्यू झाला आहे.

विकास काटे, ठाणे

Thane : ठाणे वर्षा मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकाचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. देवाती बेन्नी असे मृत्यू झालेल्या स्पर्धकाचे नाव आहे. देवाती हे ठाण्यातील वसंत विहार भागातील रहिवासी होते. बेन्नी यांच्या मृत्यूने हळहळ व्यक्त केली जात आहे. देवाती यांच्यासोबत त्यांच्या पत्नीनेही सहभाग नोंदवला होता.

ठाणे महापालिका आणि ठाणे जिल्हा हौशी अॅथलेटिक्स असोसिएशनच्या वक्तीने ३१ व्या वर्षी मॅरेथॉन स्पर्धेचे रविवारी आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेत हजारो स्पर्धक सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं. मॅरेथॉनची सुरुवात पालिकेच्या पाचपाखाडी येथील मुख्यालयाजवळून झाली. या स्पर्धेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी झेंडा दाखवला होता. या मॅरेथॉनमध्ये एकूण १२ गटाच्या स्पर्धा होत्या.

कोरानामुळे पाच वर्ष ही स्पर्धा खंडीत झाली होती.. याच स्पर्धेत आबालवृद्धांनीही सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेत सहभागी धावपटूंचा उत्साह एकनाथ शिंदेंही मॅरेथॉनमध्ये धावले. ते धावपटूंसोबत काही अंतरावर सहभागी झाले होते.

या स्पर्धेत ठाण्यातील हॅपी वॅली परिसरात राहणाऱ्या बेन्नी दाम्पत्यांनीही सहभाग घेतला होता. बेन्नी हे २१ किलोमीटर स्पर्धेत धावल्यानंतर घरी गेले. घरी गेल्यानंतर काहीवेळाने कोसळले. रुग्णालयात दाखल केल्यानंतर बेन्नी यांना मृत घोषित केले. बेन्नी यांच्या अचानक मृत्यू झाल्याने ओळखीतील लोकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

ठाण्यातील हॅपी वॅली परिसरात राहणारे देवाती बेन्नी हे दरवर्षी वर्षा मॅरेथॉन स्पर्धेत सहभाग घेत होते. विशेष म्हणजे ते दररोज व्यायाम शाळेतही जात होते. वर्षा मॅरेथॉनसाठी त्यांनी विशेष मेहनतही घेतली होती. ठाणे महापालिकेने आयोजित केलेल्या ३१ व्या वर्षा मॅरेथॉन मध्ये २१ किमी स्पर्धेत त्यांनी सहभाग घेतला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'जोपर्यंत CM तोपर्यंत लाडकी बहीण योजना'; मुख्यमंत्री फडणवीसांनी योजनेबाबत दिला शब्द

Shocking: लग्नाला ३ वर्षे झाली, तरीही मुल होत नाही; टेन्शनमध्ये शक्तीवर्धक गोळ्या खाल्ल्या, तरुणासोबत भयंकर घडलं

Crime News: माध्यमिक शाळेची शिक्षिका चॅटिंग करत पाठवायची बाथरूमचे फोटो, नंतर घरी बोलवायची अन्....

RSS संविधान आणि तिरंगा मानत नाही, कारण...; सुजात आंबेडकर नेमकं काय म्हणाले? VIDEO

Dilip Walse Patil : माझं राजकीय वजन कमी झालंय; दिलीप वळसे पाटील असं का म्हणाले?

SCROLL FOR NEXT