THANE KHAREGAON CAR ACCIDENT saam tv
मुंबई/पुणे

अपघाताचा थरार! चालकाचं कारवरील नियंत्रण सुटलं अन् ३-४ वाहनांना धडाधड उडवलं

Thane Kharegaon Car Accident One Person Killed And Two Injured: ठाण्यातील खारेगाव येथे पार्किंगमधून कार बाहेर काढताना चालकाचे नियंत्रण सुटले. अनियंत्रित कारने ३ ते ४ वाहनांना धडक दिल्याने तीन जण जखमी झाले.

Omkar Sonawane

विकास मिरगणे, साम टीव्ही

कळवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खारेगाव येथे अरुंद रस्त्यावर कारचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात झाला. पार्किंगमधून कार बाहेर काढताना चालकाचा ताबा सुटला आणि अनियंत्रित कारने रस्त्यावरील तीन ते चार वाहनांना धडक दिली. या अपघातात तीन जण जखमी झाले असून, त्यापैकी एका व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. एक जण गंभीर तर अन्य एक जण किरकोळ जखमी असल्याची माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित कारचालक आपल्या आत्येभावाकडे आला होता. त्याच ठिकाणी कार पार्क करण्यात आली होती. पार्किंगमधून कार बाहेर काढत असताना अचानक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यानंतर कार अनियंत्रितपणे रस्त्यावर आली आणि जवळील तीन ते चार वाहनांना धडक दिली. या धडकेत दोन ते तीन वाहनांचे नुकसान झाले आहे. या अपघातात तीन जण जखमी झाले. जखमींपैकी एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून, एकाची प्रकृती गंभीर आहे, तर एका व्यक्तीला किरकोळ दुखापत झाली आहे.

अपघातातील कारचालक ३१ वर्षांचा असून तो कुरळे परिसरात राहत असल्याची प्राथमिक माहिती आहे. संबंधित कार चालकाच्या पत्नीच्या नावावर असल्याचेही समोर आले आहे. अपघातानंतर कळवा पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतले असून त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. या प्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अमरावती जिल्ह्यातील सोनोरी गावात वाघाच्या हल्ल्यामध्ये पंधरा वर्षीय मुलीचा मृत्यू

...तर भाजपला आम आदमी पार्टी व्हायला वेळ लागणार नाही; आमदाराच्या कार्यकर्त्यांना कानपिचक्या

Types of Paithani Saree Design: सणासुदीत उठून दिसायचंय? ट्राय करा 'या' ७ खास लेटेस्ट डिझाइन्सची पैठणी साडी

Mumbai Beach : मुंबईजवळचं 'मिनी गोवा'! पावसाळ्यात निसर्ग प्रेमींसाठी परफेक्ट ठिकाण

Monday Horoscope: मोठ्यांचा आदर करा! 4 राशींच्या व्यक्तींना होणार धनलाभ; वाचा सोमवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT