Thane News Saam tv
मुंबई/पुणे

Bhiwandi Traffic : भिवंडीमध्ये वाहतुकीत मोठा बदल, शहरात जड वाहनांना प्रवेशबंदी, पर्यायी मार्ग कोणते? वाचा

Thane News : भिवंडी शहरातील जड व अवजड वाहनांना प्रवेशबंदीचा निर्णय ठाणे वाहतूक विभागाने घेतला आहे. गुढीपाडव्यापासून लागू झालेल्या या अधिसूचनेमुळे अपघात आणि वाहतूक कोंडी कमी होणार असून, भिवंडीकरांना दिलासा मिळणार आहे.

Alisha Khedekar

  • भिवंडी शहरात सर्व जड-अवजड वाहनांना २४ तासांची बंदी लागू

  • गुढीपाडव्यापासून ठाणे वाहतूक विभागाची अधिसूचना प्रभावी

  • वाहतूक कोंडी, अपघात व कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी निर्णय

  • जड वाहनांना शहराऐवजी वंजारपट्टी नाका मार्गे वळवण्यात येणार

भिवंडी शहरातील नागरिकांसाठी वाहतुकीच्या दृष्टीने एक महत्त्वाचा निर्णय ठाणे शहर वाहतूक विभागाने घेतला आहे. शहरातून होणारी जड आणि अवजड वाहनांची अखंड वाहतूक, वाढलेली कोंडी आणि अपघाताच्या घटनांना आळा घालण्यासाठी अखेर प्रशासनाने पाऊल उचलले आहे. ठाणे शहर वाहतूक विभागाचे पोलिस उपआयुक्त डॉ. विनयकुमार राठोड यांनी नुकतीच एक अधिसूचना जारी करून भिवंडी शहरात सर्व प्रकारच्या जड-अवजड वाहनांना प्रवेशबंदी घातली आहे.

गुजरातला जाणारी आणि गुजरातहून मुंबई, नाशिककडे येणारी हजारो मालवाहतूक करणारी अवजड वाहने भिवंडी मार्गे प्रवास करीत असतात. या वाहनांमुळे शहरातील रस्त्यांवर प्रचंड वाहतूक कोंडी होत असून, नागरिकांना दैनंदिन प्रवास करताना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. अनेकदा वाहतुकीतील या गोंधळामुळे रुग्णवाहिका रस्त्यात अडकून राहिल्याच्या घटना घडल्या आहेत.

भिवंडी शहर हे मुंबई महाप्रदेशाचे प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाते. त्यामुळे गुजरात, मुंबई, नाशिक या तिन्ही दिशांमधील जड वाहनांची ही वाहतूक येथे थांबत नाही. याशिवाय भिवंडीमध्ये मोठा वस्त्रोद्योग आहे. यंत्रमाग, डाईंग, सायझिंगसह प्लास्टिक मोती बनवण्याचे कारखाने येथे आहेत. तसेच भिवंडी हे लॉजिस्टीक हब असल्याने मोठ्या प्रमाणात मालवाहतुकीची रहदारी कायम सुरू असते. मात्र, या गर्दीमुळे शहरात रस्त्यांची मोडतोड, अपघात आणि शिस्तभंगाचे प्रकार वाढत होते. गेल्या काही वर्षांत या वाहनांमुळे झालेल्या अपघातात अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

यावर उपाय म्हणून वाहतूक विभागाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. गुजरातला जाणाऱ्या व येणाऱ्या सर्व जड वाहनांसाठी वंजारपट्टी नाका उड्डाणपुल मार्गाने वाडामार्गे जाण्याची सक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे शहराच्या मध्यवर्ती भागात जड वाहनांची रहदारी थांबणार असून, नागरिकांना दिलासा मिळणार आहे. प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, शहरातील स्थानिक व दैनंदिन वापरातील वाहने मात्र नेहमीप्रमाणे चालू राहतील.

भिवंडीतील जड वाहनांमुळे वाहतूक कोंडी, जीवितहानी आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याने दीर्घकाळ या निर्णयाची मागणी केली जात होती. अखेर ठाणे वाहतूक विभागाने कारवाई करताच शहरातील वातावरणात हलकासा दिलासा मिळाला आहे. हिंदु नववर्षाच्या शुभमुहूर्तावर लागू झालेली ही अधिसूचना आगामी काळात भिवंडीकरांसाठी एक सकारात्मक बदल घडवून आणेल, अशी अपेक्षा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: आदिवासींचा उलगुलान मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयानंतर आदिवासी आयुक्त कार्यालयावर धडकला

Uri : आदल्या रात्री डझनभर ड्रोन, दुपारी घुसखोरीचा प्रयत्न आणि गोळीबार; जम्मू-काश्मीरमध्ये जवानांनी उधळला मोठा डाव

Disha Patani: दिशाच्या बोल्ड लूकने केलं इंटरनेट जाम, फोटो व्हायरल

Pune Tourism : विकेंडला पुण्याजवळ कुठे जाल? जाणून घ्या ही Top 5 सुंदर ठिकाणे

Ganpati Decoration Ideas: द्रोण, फुलं आणि जास्वंद फुलांनी करा बाप्पाच्या आगमनाची सुंदर सजावट

SCROLL FOR NEXT