Hindi Marathi Controversy Saam Tv
मुंबई/पुणे

Political News : मराठी माणसांना भडकावून मते मिळवणे हाच ठाकरेंचा उद्देश; शिंदे गटाची आगपाखड

Hindi Marathi Controversy : शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी ठाकरे बंधूंवर टीका करत उद्धव ठाकरे यांच्या भाषणाला निवडणूक डोळ्यासमोर ठेवलेलं राजकारण म्हणत टीका केली आहे. मराठी मुद्द्यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप वाढले आहेत.

Alisha Khedekar

मीरा रोड येथे अमराठी दुकानदाराने मराठीत बोलण्यास नकार दिल्याने मनसैनिकांनी त्याला कानशिलात लगावली. या हल्ल्यानंतर हिंदी मराठी भाषिक वादाचे पडसाद आता राजकारणातही उमटू लागले आहेत. या वादात हिंदी भाषिक नेत्यांनीही ठाकरे बंधूंवर टीकास्त्र केले. अशातच आता शिंदे गटाच्या नेत्यांनीही वरळीत ठाकरे बंधूनी केलेल्या भाषणावर प्रत्युत्तर दिले आहे. शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी ठाकरे बंधूंवर खोचक टीका केली आहे.

शिंदे सेनेचे नेते खासदार नरेश म्हस्के यांनी शनिवारी झालेल्या विजयी मेळाव्यात ठाकरे बंधूनी केलेल्या भाषणावर प्रश्न उपस्थित केले आहे. नरेश म्हस्के म्हणाले, राज साहेब ठाकरे यांच्यावर किंवा यांच्या विरोधात बोलण्याचा विषय काय येतो? ना कुठला पक्ष, ना कुठला झेंडा अशी त्यांची भूमिका होती. मात्र उद्धव ठाकरे यांनी हिंदी सक्ती, मराठी भाषा सोडून खालच्या पातळीची टीका केली आहे.

मुंबई महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन त्यांनी भाषण केल. या दरम्यान उद्धव ठाकरे हे हारलेले दिसून आले. राज ठाकरे आमच्याबद्दल काही बोलले नाहीत म्हणून आम्ही त्यांच्याबद्दल काही बोलणार नाही. मात्र उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आम्ही बोलत राहू. मराठी माणसांना भडकावून त्यांची मत मिळवणे हाच त्यांचा उद्देश होता." असे नरेश म्हस्के म्हणाले.

पुढे म्हस्के म्हणाले," तुमची एक हिंदी भाषिक खासदार आहे,प्रियांका चतुर्वेदी यांना दोन शब्द मराठीत बोलता येत नाहीत. त्यांना तर बाळासाहेब ठाकरे हे नाव सुद्धा स्पष्ट घेता येत नाही त्या बालासाहेब म्हणतात." म्हस्के यांच्या या खोचक टीकेनंतर ठाकरे बंधू काय बोलणार याकडे मनसैनिक आणि ठाकरेंच्या शिवसैनिकांचे लक्ष लागले आहे. दरम्यान म्हस्के यांनी फक्त ठाकरे बंधूंवर पलटवार न करता संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांचं वाटोळं केल आहे अशापद्धतीची टीका केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

टँगो पंच, ठोकी संत्राच्या बनावट दारूचे ६०० बॉक्स जप्त; नवी मुंबईत खळबळ

Maharashtra News Live Update: मंत्री बावनकुळे यांनी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात घेतला जनता दरबार

Who Is Kaustubh Gawade: कोण आहेत भाजपचे उमेदवार कौस्तुभ गावडे? जाणून घ्या शैक्षणिक आणि राजकीय जीवनाची A टू Z माहिती

Rice For Diabetes: डायबिटीजच्या रूग्णांनी भात खावा की नाही? भात खाल्ल्याने रक्तातील साखरेवर काय परिणाम होतो?

शिंदे गटाच्या नेत्याला मुंबईत अटक; राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT