Abhishek Ghosalkar Firing Saam Tv
मुंबई/पुणे

Abhishek Ghosalkar Death: गोळीबारात ठाकरे गटाच्या अभिषेक घोसाळकरांचा मृत्यू, पोलीस उपआयुक्त रोशन यांनी दिली माहिती

Abhishek Ghosalkar Firing : अभिषेक घोसाळकर हे ठाकरे गटाचे नेते आणि माजी आमदार विनोद घोसाळकरांचे पुत्र होते. पैश्याचा वादातून हा हल्ला झाल्याचं सांगण्यात येत आहे. चालू फेसबुक लाईव्हच्या दरम्यान मॉरिसने अभिषेक घोसाळकर यांच्यावर पाच गोळ्या झाडल्या.

Bharat Jadhav

Abhishek Ghosalkar Death In Firing:

ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकरांवर झालेल्या गोळीबारात त्यांचा मृत्यू झालाय. फेसबुक लाईव्ह चालू असताना मॉरिस नोरोन्हा नावाच्या व्यक्तीने अभिषेक घोसाळकरांवर याच्यावर गोळ्या झाडल्या. हल्ला झाल्यानंतर घोसळकर यांना करुणा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे उपाचार चालू असताना त्यांचा मृत्यू झाला, असल्याची माहिती पोलीस उपआयुक्त राजतिलक रोशन यांनी दिलीय. (Latest News)

गोळीबाराचा थरार फेसबुक लाईव्हमध्ये दिसला आहे. आपआपसातील वादातून गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली. अभिषेक घोसाळकर हे ठाकरे गटाचे नेते आणि माजी आमदार विनोद घोसाळकरांचे पुत्र होते. पैश्याचा वादातून हा हल्ला झाल्याचं सांगण्यात येत आहे. चालू फेसबुक लाईव्हच्या दरम्यान मॉरिसने अभिषेक घोसाळकर यांच्यावर पाच गोळ्या झाडल्या यातील तीन गोळ्यांना अभिषेक घोसाळकर यांना लागल्या.

मिळालेल्या माहितीनुसार दहिसरच्या मॉरीसभाई याच्या कार्यालयात ही घटना घडली. आरोपी मॉरीस यांच्या कार्यालयात मॉरीस नोरोन्हा आणि अभिषेक घोसाळकर हे दोघेही इंग्रजीत एकमेकांसोबत चर्चा करताना दिसत आहेत. फेसबुक लाईव्ह करत असताना मॉरीस खुर्चीतून उठून जातो, त्यानंतर अभिषेक घोसाळकर हेदेखील निघून जात असतात. त्याच दरम्यान त्यांच्या मॉरीसने गोळ्या झाडल्या. हे दृश्य फेसबूक लाईव्हमध्ये कैद झाले आहेत.

फडणवीसांनी राजीनामा द्यावा; संजय राऊतांची मागणी

माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची आज फेसबुक लाईव्हमध्ये हत्या करण्यात आली. यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर टीका केली. तसेच त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली. अभिषेक घोसाळकर यांच्यावरील गोळीबार धक्कादायक आहे. गृहमंत्री फडणवीस चाय पे चर्चा करीत फिरत आहेत!फडणवीस राजीनामा द्या, अशी मागणी राऊत यांनी केली.

महाराष्ट्रात गुंडांचे राज्य सुरू आहे असे मी रोज सांगतोय. मुख्यमंत्री आणि त्यांचा मुलगा रोज गुंड टोळ्याना भेटत आहेत, पक्षात प्रवेश देत आहेत. गृहमंत्री अदृश्य झालेत. राज्य गुंडांच्या तावडीत आहे म्हणूनच कायद्याची भीती उरली नसून पोलीस हे शिंदे गँगच्या सेवेसाठीच उरले आहेत, असा आरोपही संजय राऊत यांनी केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मेडिकल स्टोरमधून औषधं घेताय? सावधान ! दैनंदिन वापरातील 157 औषधं धोकादायक?

जीवघेणे मॅनहोल बीएमसीची पोलखोल; महापौरांसमोरच कर्मचारी मॅनहोलमध्ये पडला

हॉटेलवाल्यांनो ! व्हेज-नॉनव्हेज वेगवेगळं ठेवा; किचन कसं असावं? तुकाराम मुंढेंनी सांगितले हॉटेलचे नवे नियम

Pune Ketan Agrawal Death Case: केतन अग्रवालचा जीव वाचला असता; आधीच संशय आला होता, पण..

Pune Crime: 2000 फोन कॉल, 238 तास चर्चा आणि 3 प्लॅन; पुण्याच्या कॅफेत रचला केतनच्या हत्येचा कट, वाचा इनसाईड स्टोरी

SCROLL FOR NEXT