अदानी ग्रुपला धारावी झोपडपट्टीच्या पुनर्विकासाचे काम दिल्याच्या विरोधात आज ठाकरे गटारे भव्य मोर्चा काढला होता. या मोर्च्यात उद्धव ठाकरे यांनी राज्य आणि केंद्र सरकाराला लक्ष्य केलं आहे. त्यांनी यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका केली आहे. अशातच त्यांच्या आजच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे जाणून घेऊ...
यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, ''प्रश्न फक्त हा लढा फक्त मुंबईसाठी नाही, राज्यासाठी आहे. याचा फटका महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेवर बसणार आहे.'' ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
देवनारबद्दल बोलत उद्धव ठाकरे म्हणाले की, ''धारावीसोबत देवनार ही अदानींला देणार आहेत. सर्व अदानींला देणार आहेत. धारावीत बूट ही बनतात, पापड ही बनवतात. वेळ आली तर, पापडासारखं लाटून टाका.'' (Latest Marathi News)
उद्धव ठाकरे म्हणाले, ''कोरोना काळात यांनी फक्त थाळी वाजवली, आम्ही मात्र धारावीला वाचवलं.''
ते म्हणाले, ''सर्व चोरलं, पण माझ्यावरील जनतेचा विश्वास नाही चोरू शकणार. भाजप मुंबई महापालिकेच्या निवडणूक घेत नाही, यांना चिंता आहे. पण आमचं सरकार येणार.''
गुजरातमध्ये वर्ल्डकपची फायनल झाली. यावरून उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारला लक्ष्य केलं आहे. ते म्हणाले आहे की, ''वर्ल्ड कपची फायनल सुद्धा गुजरातमध्ये नेली. त्यांना भारत जिंकेल किंवा हारेल याची चिंता नव्हती. पैसे पाहीजे होते.''
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.