shivaji park saam tv
मुंबई/पुणे

Shivsena Dasara Melava : शिवाजी पार्कवर यंदाही ठाकरे गटाची सभा? शिवसेना शिंदे गटाकडून जागेचा शोध सुरु...

Shivsena News : शिवाजी पार्कवर यंदाही ठाकरे गटाची सभा? शिवसेना शिंदे गटाकडून जागेचा शोध सुरु...

सूरज सावंत

Mumbai News :

शिवसेना पक्षाच्या फुटीनंतर मागील वर्षी पहिल्यांदाच ठाकरे गट आणि शिंदे गट असे पक्षाचे दोन वेगळे दसरा मेळावे पार पडले होते. दोन्ही गटांनी आपला दसरा मेळावा यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले.

मागील वर्षी ठाकरे गटाला शिवाजी पार्क मैदानात दसरा मेळाव्यासाठी जागा मिळाली होती. मात्र यंदाच्या वर्षी ठाकरे गटाला शिवाजी पार्कमध्ये जागा मिळेल का? याबाबत पुन्हा चर्चा सुरु झाली आहे. (Political News)

गेल्यावर्षी मैदानावरून ठाकरे गट आणि शिंदे गट आमने-सामने आले होते. यावर्षी दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान मिळावं म्हणून ठाकरे गटाकडून आधीच अर्ज दाखल करण्यात आला आहे. ठाकरे गटाने मुंबई महापालिकेला महिनाभरापूर्वीच अर्ज दिला आहे.

महापालिका मैदानाची परवानगी देण्यासंदर्भात सावध भूमिकेत आहे. मात्र यावेळी देखील आम्हालाच मैदान मिळेल असा विश्वास ठाकरे गटाला आहे. (Latest Marathi News)

शिंदे गटाकडून जागांचा शोध सुरू

ठाकरे गटाकडून दसरा मेळावासाठी अर्ज दाखल केल्यानंतर आता शिवसेना शिंदे गटाकडून जागांचा शोध सुरू झाला आहे. मागच्या वर्षी मुंबई उच्च न्यायालयाने ठाकरे गटाला शिवाजी पार्कवर परवानगी दिल्यानंतर शिंदे गटाने बीकेसीत दसरा मेळावा घेतला होता.

बीकेसीतील विकासकामांमुळे यंदा बीकेसीत मेळावा घेणं शक्य नाही. त्यामुळे शिवसेना शिंदेगटाकडून महालक्ष्मी रेसकोर्सवर दसरा मेळावा घेण्याच्या विचारात असल्याची माहिती विश्वसणीय सूत्रांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart Attack : हार्ट अटॅक अन् हाय बीपीचा धोका होईल कमी, डाएटमध्ये आजपासून समावेश करा 'या' ३ भाज्यांचा

Vastu Tips Of Furniture Placement: घरात फर्निचरची मांडणी करताना 5 महत्वाच्या वास्तू टिप्स

Maharashtra News Live Update: मनोज जरांगे पाटील यांचा पाटोदा येथे पहिला मुक्काम

Pune : पुण्यात रिलस्टारकडून तरुणावर कोयत्याने हल्ला, सुनेत्रा पवार अ‍ॅक्शन मोडवर; कारवाईचे आदेश

२५, ३० की ४०... घर खरेदी करण्याचं योग्य वय कोणतं? जाणून घ्या प्रॉपर्टी घेण्याची परफेक्ट वेळ

SCROLL FOR NEXT