NCP (SP) councillor Ajit Rawarane’s support to the BJP–Shinde Sena alliance reshapes Mumbai civic politics ahead of the mayoral election. Saam Tv
मुंबई/पुणे

ठाकरे बंधूंना मोठा धक्का, शरद पवारांची राष्ट्रवादी भाजप-शिंदेसेना महायुतीसोबत

Mumbai Civic Politics Sees Major Shift: मुंबई महापालिकेत महापौरपदाच्या निवडीआधीच ठाकरे बंधूंना मोठा धक्का बसलाय...शरद पवारांच्या नगरसेवकानं घेतलेल्या एका भूमिकेनं महाविकास आघाडीत कशी फूट पडलीय? आणि मविआच्या याचं फुटीचा महायुतीला कसा फायदा होणार आहे?

Suprim Maskar

मुंबई महापालिकेत महापौरपदाच्या निवडीआधीच मोठा राजकीय भूकंप झालाय.. ठाकरे बंधूंसोबत निवडणुक लढवणाऱ्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं निवडणुकीनंतर आता वेगळी वाट निवडलीय...शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे एकमेव नगरसेवक अजित रावराणे यांनी महायुतीला पाठिंबा दिला आहे. आपल्या प्रभागातील विकासकामांसाठी आणि निधीसाठी आपण महायुतीसोबत जात असल्याचं रावराणे यांचं म्हणणं आहे रावराणेंच्या पाठिंब्यानंतर भाजपनं मात्र ठाकरेंना चांगलचं डिवचलयं...

एकीकडे ठाकरेसेना मुंबई महापालिकेत संख्याबळ नसतानाही महापौर आणि उपमहापौर पदी उमेदवार देण्याबाबत विचार करतयं... अशातच दोन्ही राष्ट्रवादीनं शिंदेसेनेला पाठिंबा दिल्यानं नवं राजकीय समीकरण स्पष्ट झालयं..महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडीत संख्याबळाचं गणित आता महायुतीच्या बाजूनं झुकलयं...शिंदेसेनेचा दोन्ही राष्ट्रवादीसोबत पालिकेत सहयोगी गट स्थापन कऱणार..त्यामुळे महापालिकेत शिंदेसेनेची ताकद वाढलीय...तसचं समित्यांच्या निवडणुकीमध्ये महायुतीला फायदा होण्याची शक्यता आहे. महायुतीची स्थायी समिती सदस्य आणि सुधार समिती सदस्य संख्या 13 वरून 14 वर जाण्याची तर महायुतीची स्वीकृत नगरसेवक संख्याही एकने वाढून 5 स्वीकृत नगरसेवक महापालिकेत बसतील...

दरम्यान ही पक्षाची भूमिका आहे की वैयक्तिक नगरसेवकाची हे पाहावं लागेल, असं विधान ठाकरेसेनेनं केलयं... तर अजित रावराणेंनी पक्षनेतृत्वाला याबाबत माहिती न दिल्याचं सांगत मुंबईतील प्रमुख नेत्यांशी चर्चा केल्याचं स्पष्ट केलंय...

रावराणे यांनी परस्पर हा निर्णय घेतल्याचं म्हटल आहे.मात्र असं असलं तरी दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा सुरु असताना मुंबईत शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं घेतलेली भूमिका महायुतीशी जुळवून घेण्याचा पहिला टप्पा म्हणायचा का? .

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Weather Update: अखेर मान्सून संपूर्ण महाराष्ट्रात सक्रिय; पुढील ५ दिवस या जिल्यात मुसळधार, IMD कडून अलर्ट

Maharashtra News Live Update: नसरापूर प्रकरणाचा आज न्यायालयात निकाल

Mumbai Local : लोकलमधील हत्येप्रकरणी आरोपीचा धक्कादायक खुलासा; 'त्या' रात्री नेमकं काय घडलं?

Thursday Horoscope : जोडीदारासोबत शांततेत दिवस जाणार, 5 राशींच्या व्यक्तींसाठी दिवस ठरणार गेमचेंजर; वाचा गुरूवारचे राशीभविष्य

मेडिकल स्टोरमधून औषधं घेताय? सावधान ! दैनंदिन वापरातील 157 औषधं धोकादायक?

SCROLL FOR NEXT