पुणे : महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषद आयुक्त आणि महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचा अतिरीक्त कार्यभार सांभाळणारे तुकाराम सुपे यांना पुणे पोलिसांनी चौकशीला बोलावल होत. आरोग्य भरती (Health Recruitment) आणि म्हाडा पेपर (MHADA) फुटी प्रकरणात अटक (Arrested) आरोपी डॉ. प्रीतिश देशमुख यांच्या घरी टीईटी परीक्षेची (TET Exam) ओळखपत्र याच्या घरी सापडल्यानंतर पुणे पोलिसांचा (police) टीईटी परीक्षेचा घोटाळा शोधण्यासाठी तपास सुरू केला आहे.
हे देखील पहा-
पुणे सायबर विभागाच्या (Pune Cyber) कार्यालयामध्ये ही चौकशी केल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे. आज त्यांना कोर्टात (court) हजर करण्यात येणार आहे. या प्रकरणात आता अनेक मोठे अधिकारी सहभागी असण्याची शक्यता आहे. मागील काही दिवसांपासून राज्यामध्ये (state) वेगवेळ्या परीक्षांमध्ये पेपर फोडणारे आणि घोटाळे करणारे रॅकेट समोर येत आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच म्हाडाच्या परीक्षांमध्ये देखील असाच घोळ झाल्यानंतर अचानक परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यावेळीही प्रवेशपत्र वगैरे प्रक्रियेत गोंधळ झाला होता.
Edited By- Digambar Jadhav
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.