टेस्लाने मुंबईतील बीकेसीमध्ये भारतातील पहिले शोरूम उघडले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झाले.
हे शोरूम ‘टेस्ला एक्सपिरियन्स सेंटर’ म्हणून कार्यरत असेल
शोरूमच्या पाट्या मराठी आणि इंग्रजीत लावल्या, मराठी भाषेला विशेष मान मिळाला.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी टेस्लाच्या स्थानिक भाषा आणि संस्कृतीच्या आदराचे कौतुक केले.
इलेक्ट्रिक वाहन निर्मिती क्षेत्रातील नामांकित कंपनी टेस्लाने आज मुंबईतील बीकेसीमध्ये भारतातील आपल्या पहिल्या शोरूमचे उद्घाटन केले. टेस्ला कंपनीच्या भारतातील पहिल्या आणि आधुनिक शोरूमचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झाले. टेस्लाने आपल्या शोरूमच्या पाट्या मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये लावल्या आहेत, ज्यामुळे मराठी भाषेला विशेष मान मिळाला आहे. मुख्यमंत्र्यांनी टेस्लाच्या या पाऊलाचे स्वागत करताना स्थानिक संस्कृती आणि भाषेचा आदर करण्याच्या कंपनीच्या भूमिकेचे कौतुक केले.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी उद्घाटन समारंभात सांगितले की, टेस्लासारख्या जागतिक कंपनीचे महाराष्ट्रात आगमन हे राज्याच्या औद्योगिक प्रगतीला चालना देणारे आहे. “टेस्लाने मराठी भाषेचा आदर राखत स्थानिक नियमांचे पालन केले आहे. यामुळे राज्यातील स्थानिकांना रोजगाराच्या संधीही उपलब्ध होतील,” असे ते म्हणाले. त्यांनी पुढे नमूद केले की, महाराष्ट्र सरकार निवेशकांसाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्यास कटिबद्ध आहे आणि टेस्लाचे हे शोरूम राज्याच्या आर्थिक विकासाला चालना देईल. टेस्लाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, हे शोरूम ग्राहकांना इलेक्ट्रिक वाहनांचा अनुभव देण्यासाठी ‘टेस्ला एक्सपिरियन्स सेंटर’ म्हणून कार्यरत असेल. येथे ग्राहकांना टेस्लाच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाची माहिती मिळेल आणि वाहनांची चाचणीही घेता येईल.
जगातील सर्वात स्मार्ट कार मुंबईपासून आता भारतात लाँच होत आहे, ही महाराष्ट्रासाठी आनंदाची गोष्ट आहे. महाराष्ट्र सरकारने EV गाड्यांसाठी अनेक सुविधा लागू केल्या आहेत. चार्जिंग स्टेशन, गाडीवरचे टॅक्सेस आणि विविध इन्सेन्टीव्ह त्यांना दिलेले आहेत. त्यामुळे महाराष्ट्र हे देशातील EV करिता सर्वात आवडते ठिकाण झालेय.देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री महाराष्ट्र
टेस्लाच्या मुंबईतील शोरूममुळे भारतातील इलेक्ट्रिक वाहन बाजारपेठेला नवे बळ मिळणार आहे. कंपनीने स्थानिक भाषेचा, लोकांचा आदर राखत मराठी भाषेत पाट्या लावण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मराठी संस्कृती आणि भाषेचा सन्मान झाल्याची भावना सोशल मीडियावर व्यक्त होतेय. अनेकांनी टेस्लाच्या मराठी पाटीच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. स्थानिक भाषेचा आदर राखणे हे टेस्लाचे मोठे पाऊल आहे. यामुळे मराठी भाषेचा गौरव वाढला, असे एका नेटकऱ्याने म्हटले.
टेस्लाच्या भारतातील पहिल्या शोरूमचे उद्घाटन कधी झाले?
15 जुलै 2025 रोजी.
भारतामध्ये टेस्लाचे पहिले शोरूम कुठे आहे?
भारतातील टेस्लाचे पहिले शोरूम मुंबईतील बीकेसीमध्ये आहे.
देशातील पहिल्या टेस्लाच्या शोरूमचा पत्ता काय?
देशातील पहिल्या टेस्ला शोरूमचा पत्ता मुंबईतील बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) येथे आहे. नेमका पत्ता माहितीमध्ये दिलेला नाही, परंतु तो BKC मधील टेस्ला एक्सपिरियन्स सेंटर म्हणून आहे. अधिक माहितीसाठी टेस्लाच्या अधिकृत वेबसाइटवर तपासणी करावी.
टेस्ला कंपनीचा मालक कोण आहे?
टेस्ला कंपनीचे मालक आणि सीईओ इलॉन मस्क आहेत.
भारतात टेस्लाच्या कारची किंमत किती रूपये आहे? टेस्लाची शोरूम आणि ऑनरोड किंमत किती आहे?
टेस्ला मॉडेल Y ची एक्स-शोरूम किंमत ₹59.89 लाख ते ₹69.15 लाख, मुंबईत ऑन-रोड ₹63 लाख ते ₹70 लाख. किंमती स्थानिक करांनुसार बदलू शकतात. अधिकृत किंमत टेस्लाच्या संकेतस्थळावर असेल.
टेस्लाने पहिल्या शोरूमच्या पाट्यांवर मराठी भाषेचा वापर का केला?
स्थानिक संस्कृती आणि भाषेचा आदर राखण्यासाठी टेस्लाने पहिल्या शोरूमच्या पाट्यांवर मराठी भाषेचा वापर केला आहे.
लोकांनी टेस्लाच्या कोणत्या निर्णयाचे स्वागत केले?
मराठी भाषेत पाट्या लावण्याच्या निर्णयाचे लोकांकडून स्वागत करण्यात आले. त्यासंदर्भात एक्सवर पोस्ट करत कौतुक करण्यात आलेय.
टेस्लामुळे भारतातील कोणत्या बाजारपेठेला बळ मिळेल?
टेस्ला कार भारतात धावल्यामुळे आपल्या इलेक्ट्रिक वाहन बाजारपेठेला मोठा फायदा होणार आहे
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.