Mumbai - Agra Highway Accident Saamtv
मुंबई/पुणे

Mumbai - Agra Highway Accident: मुंबई आग्रा महामार्गावर एसटी- कंटेनरचा भीषण अपघात! कंडक्टरचा जागीच मृत्यू; ४ जखमी

Accident News: अपघातातील जखमींना तात्काळ चांदवडच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Gangappa Pujari

अजय सोनवणे, प्रतिनिधी

Mumbai - Agra Highway Accident:

मुंबई -आग्रा महामार्गावरुन भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. महामार्गावरील चांदवड चौफुलीवर एसटी-कंटेनरचा भीषण अपघात झाला. यामध्ये कंडक्टरचा जागीच मृत्यू झाला असून 4 कॉलेज विद्यार्थ्यांसह काही प्रवासी जखमी झाले आहेत. (Latest Marathi News)

याबाबत अधिक माहिती अशी की, राज्यभर गणपती विसर्जनाचा जल्लोष सुरू असतानाच मुंबई आग्रा महामार्गावर एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. महामार्गावरील चांदवड चौफुलीवर एसटी-कंटेनरचा भीषण अपघात झाला. यामध्ये कंडक्टरचा जागीच मृत्यू झाला असून 4 कॉलेज विद्यार्थ्यांसह काही प्रवासी जखमी झाले आहेत.

अपघातातील जखमींना तात्काळ चांदवडच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा अपघात इतका भीषण होता की, बसचा मागचा भाग पूर्णपणे कापला गेला. या दुर्देवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

बुलढाण्यात गणेश भक्तांच्या गाडीला अपघात...

दरम्यान, बुलढाण्यामधूनही एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. बुलढाण्याच्या खामगाव येथील सतीफैल भागातील गणेश मंडळ जनुना तलाव येथुन गणपती विसर्जन करुन घरी येत होते. यावेळी जनुना चौफुल्लीवर त्यांच्या वाहनाला भरधाव ट्रकने जोरदार धडक दिली. या अपघातात ११ जण गंभीर जखमी झाले आहेत.

रिक्षावर ट्रक उलटून ४ ठार...

चंद्रपूर (Chandrapur) शहरातील बल्लारपूर बायपास जवळ रिक्षा- आणि ट्रकमध्ये भीषण अपघात (Accident) झाला. अनियंत्रित झालेला ट्रक थेट रिक्षावर उलटल्याने ही मोठी दुर्घटना घडली. अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला असून चार जण जखमी झाले आहेत. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: शरद पवारांच्या ८६व्या वाढदिवसानिमित्त पुण्यातील एका पंपावर ८६ रुपये प्रति लिटर पेट्रोल

महापालिका निवडणुका एकत्र लढवणार का? एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात विषय संपवला

Pilot Working Time: पायलट आठवड्यातून किती तास काम करतात?

New Year Celebration : न्यू ईअर सेलिब्रेट करायचा आहे? मग भारतातील या ठिकाणी नक्कीच जा

kobi Aloo Matar Bhaji: नुसती कोबीची भाजी खाऊन कंटाळता? हे पदार्थ मिक्स करून होईल चमचमीत भाजी

SCROLL FOR NEXT