shivsena Saam tv
मुंबई/पुणे

Kalyan News : कल्याणमध्ये पुन्हा राडा; पोलीस स्टेशनमध्येच शिंदे गटाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले, डोकं फोडलं

Kalyan Latest News : कल्याणमध्ये पुन्हा राडा झाला आहे. पोलीस स्टेशनमध्येच शिंदे गटाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले आहे. एका पदाधिकाऱ्याचंही डोकं फुटलं आहे.

Vishal Gangurde

अभिजीत देशमुख, साम टीव्ही

कल्याणमध्ये काल एका महिलेने माजी नगरसेवकाला मारहाण केल्याची घटना ताजी असताना आणखी एक मारहाणीची घटना घडली आहे. कल्याणमध्ये शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये पुन्हा एकदा राडा झाला आहे. पोलील स्टेशनमध्येच शिंदे गटाचे पदाधिकारी भिडले. एकमेकांना केलेल्या मारहाणीत एका पदाधिकाऱ्याच्या डोक्याला दुखापत झाली. शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या हाणामारीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

कल्याणमध्ये शिंदे गटात गेल्या काही दिवसांपासून अलबेल नसल्याचं दिसून येत आहे. शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाला मारहाण करण्यात आली. त्यानंतर आता शिंदे गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते कोळसेवाडी पोलीस ठाण्यात पोलिसांसमोरच भिडल्याचं पाहायला मिळालं. पाणी प्रश्नावरून झालेला हा वाद थेट कोळशेवाडी पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचला.

पोलीस ठाण्यात पोलिसांसमोरच शिंदे गटाचे पदाधिकारी दिलीप दाखिणकर आणि मल्लेश शेट्टी एकमेकांमध्ये भिडले. दिलीप दाखिणकर यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे. मल्लेश शेट्टी यांनी ही मारहाण केल्याचा आरोप दाखिणकर यांनी केला. तर मल्लेश शेट्टी यांनी दिलीप दाखिणकर यांनी माजी नगरसेविकेसोबत गैरवर्तन केल्याचा आरोप केला आहे.

पोलीस ठाण्याच्या आवारात मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची गर्दी जमा झाली आहे. दाखिनकर यांना मेडिकलसाठी पाठवण्यात आले. या प्रकरणी पोलीस पुढील प्रक्रिया करत आहेत. शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाला काल एका महिलेने भर रस्त्यात मारहाण केली.

माजी नगरसेवकाला मारहाण

दरम्यान, कल्याणमध्ये काल रस्त्याच्या भूमिपूजन कार्यक्रमावरून एक महिला आणि माजी नगरसेवकामध्ये वाद झाला होता. राणी कपोते असे मारहाण करणाऱ्या महिलेचं नाव आहे. राणी कपोते शिंदेंच्या पक्षाशी संबंधित असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. तर मोहन उगले असे मारहाण झालेल्या शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाचं नाव आहे. कल्याणमधील माजी नगरसेवकाच्या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अजित दादांच्या आठवणीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार भाऊक

राज्यातील 80 लाख महिला अपात्र! ₹1500 सरकारच्या डोळ्यात खुपताय का?

पोटावरची चरबी झटक्यात उतरेल! सकाळी दुधासोबत प्या 'या' हिरव्या पानांची पावडर

Satbara Utara : कामाची बातमी! ५ मिनिटात घरबसल्या काढा सातबारा, फक्त ₹१५ होणार खर्च; पाहा 7/12 ऑनलाइन काढण्याची सोपी प्रोसेस

जरांगेंची मंत्री विखे पाटलांकडे खळबळजनक मागणी, परळीवाल्या आता...; काय घडलं? VIDEO

SCROLL FOR NEXT