Mumbai Local 
मुंबई/पुणे

Mumbai Local : लोकल प्रवाशांचा सकाळ सकाळीच खोळंबा, ट्रान्स हार्बर लाईनवर बिघाड

Trans harbour line local issue : नेरूळ स्थानकावर तांत्रिक बिघाड झाल्यामुळे प्रवाशांचा खोळंबा उडाला आहे. शनिवारी सकाळी कामावर जाण्यासाठी निघालेल्या प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

Namdeo Kumbhar

शनिवारी सकाळीच मुंबईकरांना लोकल खोळंबल्यामुळे त्रासाचा सामना करावा लागलाय. ट्रान्स हार्बर लाईनवर लोकलमध्ये बिघाड झाल्यामुळे प्रवाशांना त्रासाचा सामना करावा लागत आहे. लोकल एकामागे एक थांबल्या आहेत. त्यामुळे प्रवाशी रूळावरून उतरून निघाले आहेत. कामावर वेळेत जाण्यासाठी निघालेल्या चाकारमान्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. रिक्षा बसचे अतिरिक्त भाडे, त्यात लोकल बंद यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नेरूळ स्थानकांमध्ये लोकलमध्ये तांत्रिक बिघाड झाला. सकाळीच लोकल खोळंबल्यामुळे कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. २० ते २५ मिनिटांपासून लोकलचा खोळंबा उडाला. त्यामुळे वैतागलेल्या प्रवाशांनी लोकलमधून उतरून जाण्याचा निर्णय घेतला. रेल्वे रूळावरून वाट काढत लोक निघाल्याचे व्हिडीओ समोर आले आहेत.

शनिवारी सकाळी सकाळीच ट्रान्स हार्बर लाईनवर मोठा तांत्रिक बिघाड झाला आहे. नेरुळ रेल्वे स्थानकाजवळच तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळेच पनवेलवरून ठाण्याला जाणारी लोकल ठप्प झाली आहे. नेरुळ येथे तांत्रिक बिघाड झाल्याने लोकलसेवा बंद पडली आहे. त्यामुळे प्रवासी रेल्वे रुळावरून वाट काढत कामाला निघाले आहेत. कामावर वेळेवर पोहचण्यासाठी रेल्वे रूळावरून मार्ग काढत जाण्याचा निर्णय प्रवाशांनी घेतला आहे. रेल्वेची सेवा अद्याप सुरू झालेली नाही. रेल्वेकडून तांत्रिक अडचणी दूर कऱण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking News: स्तन वाढवण्यासाठी सर्जरी केली, काही तासांत १४ वर्षांच्या मुलीचा मृत्यू; नेमकं काय घडलं?

Maharashtra Live News Update: सोलापूर दौऱ्यावर असणाऱ्या मंत्री भरत गोगावले यांचा ताफा शेतकऱ्यांनी रोखला

Mumbai Local Block: मध्य रेल्वेवर २ दिवसांचा रात्रकालीन ब्लॉक; लोकलसह ट्रेनच्या वेळापत्रकात बदल, वाचा सविस्तर

Sakhi Gokhale: मन तुझं जलतरंग, लहरी तुझा साज...

Prabalgad Fort History: ट्रेकिंगसाठी खास! सह्याद्री पर्वतरांगेतील प्रबळगड किल्ल्याचे ऐतिहासिक वैशिष्ट्ये आणि इतिहास

SCROLL FOR NEXT