team india twitter
मुंबई/पुणे

Team India : चॅम्पियन्सचं मुंबईत आगमन, विमानतळावरील पहिली झलक आली समोर,VIDEO

Team India players : चॅम्पियन्सचं मुंबईत आगमन झालं आहे. टीम इंडियाची विमानतळावरील पहिली झलक समोर आली आहे.

Vishal Gangurde

दुबईत झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये टीम इंडियाने न्यूझीलंडला धूळ चारली. टीम इंडियाने चॅम्यियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर भारतात आली आहे. टीम इंडिया मुंबई विमानतळावर पोहोचली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकलेल्या टीम इंडियाची पहिली झलक समोर आली आहे. रोहित शर्मा, हार्दिक पंड्या, श्रेय्यस अय्यरसहित अनेक खेळाडू भारतात परतले आहेत. टीम इंडियाचा कोच गौतम गंभीर देखील भारतात परतला आहे.

टीम इंडियाचं भारतात आगमन झालं आहे. दुबईतील मैदानात चॅम्पियन्स ट्रॉफीतील शेवटच्या फायनल मॅचमध्ये टीम इंडियाने न्यूझीलंडला धूळ चारली. मुंबई विमानतळावर आगमन झालेल्या खेळाडूंमध्ये रोहित शर्मा, श्रेयस अय्यर, हार्दिक पंड्या यांचा समावेश आहे. टीम इंडियाच्या चॅम्पियन्स जोरदार स्वागत केलं जावं, अशी अनेकांची इच्छा आहे.

रोहितच्या नेतृत्वात टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे. आतापर्यंत तीन वेळा टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे. रोहित शर्मा आणि इतर खेळाडूंच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात चाहते विमानतळावर जमले आहेत. अनेक चाहते खेळाडूंचे फोटो काढण्यात गुंग आहे. या ठिकाणी पोलिसांचाही मोठा फौजफाटा पाहायला मिळत आहे.

टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर खेळाडूंचं तोंड भरून कौतुक केलं होतं. अनेक चाहते सेलिब्रेशनसाठी रस्त्यावर उतरले होते. चाहत्यांनी नाचत, टीम इंडियाच्या घोषणा देत जल्लोष केला होता. टीम इंडियाचे खेळाडू मुंबईतळावर येताच चाहत्यांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sidharth Malhotra Father Passes Away: बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्यावर कोसळला दु:खाचा डोंगर, सिद्धार्थ मल्होत्राला पितृशोक

Gold Rate Today : सोन्याच्या दरात मोठी पडझड; काय आहे दिवसाअखेरचा दर?

मोठी बातमी! मुस्लीम समाजाचं ५ टक्के आरक्षण रद्द, अचानक नेमकं काय घडलं? VIDEO

रशिया-पाकिस्तानमध्ये 'यारीदोस्ती'; भारताच्या संरक्षण सज्जतेपुढे आव्हान, VIDEO

Gram Panchayat Elections: दिवाळीत उडणार ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा बार? मतदानाबाबत नवी अपडेट आली समोर

SCROLL FOR NEXT