मुंबईत टॅक्सी चालक आणि प्रवासी यांच्यातील वाद सर्रास पाहायला मिळतात. मात्र मुंबईत एका आमदाराला टॅक्सी चालकाच्या मुजोरीचा सामना करावा लागला आहे. मुजोर टॅक्सीचालकाने वादानंतर आमदार महोदयांना धमकावत टॅक्सीतून उतरवल्याचा प्रकार समोर आला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे तुमसर मतदारसंघातील आमदार राजू कोरमोरे यांना मुंबईत हा अनुभव आला आहे. एका टॅक्सी चालकाने त्यांना धमकावल्याची घटना समोर आली आहे. कोरमोरे हे टॅक्सीने वाकोला जंक्शन सांताक्रूझ येथून आमदार निवास कुलाबा येथे जाण्यासाठी निघाले होते. (Crime News)
यावेळी टोलचे पैसे देण्यावरून वाद झाल्याने टॅक्सी चालकाने आमदार राजू कोरमोरे यांना धमकावत टॅक्सीतून उतरवले. या प्रकरणी कोरमोरे यांनी वाकोला पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. (Latest Marathi News)
राजू कोरमोरे यांनी दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात वाकोला पोलीस ठाण्यात ५०६ (२), भादंवीसह १७८(३) मोवाका अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.