Tax notice to Ulhasnagar Peoples by UMC अजय दुधाणे
मुंबई/पुणे

उल्हासनगरात मालमत्ता कराचे 193 चेक बाऊन्स; महापालिकेकडून गुन्हे दाखल करण्यास सुरुवात

या सर्वांना 15 दिवसांची अंतिम मुदत देण्यात आली असून त्यानंतर त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला जाणार आहे.

अजय दुधाणे

उल्हासनगर - महापालिकेनं आता मालमत्ता कराचे चेक बाऊन्स करणाऱ्यांवर थेट गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. यंदा उल्हासनगरात (Ulhasnagar) मालमत्ता कराचे (Property Tax) तब्बल 193 जणांनी चेक बाऊन्स झाले असल्याची माहिती समोर आली आहे. या 193 जणांवर कारवाई करण्याची प्रक्रिया महापालिकेने सुरू केली आहे. उल्हासनगर महापालिकेत (Ulhasnagar Municipal Corporation) मालमत्ता कराची 450 कोटी रुपयांची थकबाकी आहे. महापालिकेनं मध्यंतरीच्या काळात कर बुडवणाऱ्या लोकांची मालमत्ता जप्त करण्याची प्रक्रिया सुरू केली होती.

हे देखील पहा -

त्यानंतर आता या करबुडव्यांनी महापालिकेला चुना लावण्याचा एक नवी शक्कल लढवली आहे. हे करबुडवे मालमत्ता कराच्या रकमेचा चेक देऊन कर भरल्याची पावती घेतात. मात्र प्रत्यक्षात बँकेमध्ये बॅलन्सच नसल्याने हे चेक बाऊन्स होतात. अशाप्रकारे तब्बल 193 जणांनी चेक बाऊन्स केल्याची माहिती समोर आली आहे. या सर्वांना 15 दिवसांची अंतिम मुदत देण्यात आली असून त्यानंतर त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला जाणार आहे. त्यामुळे हे करबुडवे आता तरी मालमत्ता कर भरतात का? या सर्वांचे लक्ष लागलेलं आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shaktipeeth Expressway :'शक्तीपीठ' ठरणार पांढराहत्ती? शेतकऱ्यांचं नुकसान, शेकडो गावांना फटका बसणार; राजू शेट्टींनी सांगितले विकासाचे अडथळे

Satara News: थरारक! साताऱ्यातील खंबाटकी घाटात ट्रकचा जळून कोळसा; वाहतूक ठप्प, VIDEO

IMD Rain Alert : महाराष्ट्रातील कोकण, विदर्भ, मराठवाडासह देशभरात ७ दिवस मुसळधार पावसाचा इशारा

Hindi Language Controversy: मला मराठी येत नाही, ताकद असेल तर महाराष्ट्रातून हाकलून द्या; केडियानंतर राज ठाकरेंना अभिनेत्याचं ओपन चॅलेंज

Maharashtra Politics : राज ठाकरे संपूर्ण भाषणात कुठेही 'ते' वाक्य बोलले नाही; एकनाथ शिंदेंच्या बड्या नेत्याचा थेट मुद्द्याला हात

SCROLL FOR NEXT