Deenanath Mangeshkar Hospital Tanisha Bhise death case Saam Tv News
मुंबई/पुणे

Tanisha Bhise Death Case: तनिषा भिसे मृत्यू प्रकरण, ससून रुग्णालयाकडून अहवाल तयार; आज सरकारला पाठवणार

Deenanath Mangeshkar Hospital: दीनानाथ रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झालेल्या तनिषा भिसे मृत्यू प्रकरणाचा अहवाल ससून रुग्णालयाकडून तयार करण्यात आला आहे. आज हा अहवाल सरकारकडे पाठवण्यात येणार आहे.

Priya More

सागर आव्हाड, पुणे

गर्भवती तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी पुण्यातील दीनानाथ रुग्णालयावर आरोप केले जात आहे. तनिषा भिसे यांच्या मृत्‍यू प्रकरणात ससूनच्या ६ वैद्यकीय तज्ज्ञांच्या समितीकडून तिन्ही अहवालाची तपासणी करून रात्री उशिरा अहवाल तयार करण्यात आला. ससूनमध्ये तज्ज्ञांचे अहवालातील निष्कर्षावर एकमत होत नसल्याने अहवाल सादर करण्यास विलंब होत आहे.

तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी ससूनमध्ये तज्ज्ञांच्या अहवाल थोड्याच वेळात ससून रुग्णालयाचे डीन एकनाथ पवार यांच्याकडे सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर ससूनचे डीन एकनाथ पवार आज सरकारला हा अहवाल पाठवणार आहेत. आज हा अहवाल राज्य सरकारला बंद लिफाफ्यात पाठवण्यात येणार आहे.

ससूनच्या ६ वैद्यकीय तज्ज्ञांच्या समितीकडून रात्री उशिरा अहवाल तयार करण्यात आला. काल दिवसभर पुण्यातील ससून रुग्णालय येथे या तज्ञ समितीच्या माध्यमातून बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत तनिषा भिसे यांचा मृत्‍यूची जबाबदारी नेमकी कोणाची यावर चर्चा करत समितीच्‍या निष्‍कर्षाचा अहवाल अलंकार पोलिसांकडे सुपूर्त करण्यात आला आहे. आता या प्रकरणी पुढील कारवाईची नेमकी दिशा ठरणार आहे.

समितीमध्ये ससूनचे वैद्यकीय अधीक्षक यांच्‍यासह, स्त्रीरोग विभागप्रमुख, औषधशास्त्र विभागप्रमुख, न्यायवैद्यकशास्त्र विभाग प्रमुख, भूलशास्त्र विभागप्रमुख, बालरोगतज्ज्ञ विभागप्रमुख अशा सहा जणांचा समावेश होता. तनिषा भिसे मृत्यू प्रकरणातील सर्व बाबी या तज्ज्ञांकडून तपासले गेले आहे. दीनानाथ रुग्णालय, सूर्या रुग्णालय, मणिपाल रुग्णालय आणि इंदिरा आयव्हीएफ फर्टिलिटी सेंटरने नोंदविण्यात आलेल्या जवाबची तपासणी देखील या तज्ज्ञ समितीकडून करण्यात आली आहे.

दरम्यान, पुण्यातल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील डिपॉजिटचा मुद्दा तापलेला असतानाच काही रूग्णालयांनी धर्मादाय कायद्याला पुरता हरताळ फासल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पुणे शहरातील ५८ पैकी १२ धर्मादाय हॉस्पिटल्सनी गेल्या वर्षभरात एकाही गरिब रूग्णावर सवलतीच्या दरात उपचार केलेले नाहीत त्यामुळे पालिका आता या रूग्णालयांवर नेमकी काय कारवाई करते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : तोडा-फोडा राज्य करा, ही यांची निती - ठाकरे

Spiritual Shells: पैशाचा पाऊस पाडणारी कौरीची शेल कशी तयार होते? याचे महत्त्व काय आहे?

Dhule Tourism : वीकेंडसाठी धुळे परफेक्ट लोकेशन, 'ही' ३ ठिकाणं पाहताच आठवड्याचा थकवा जाईल पळून

Maharashtra Live News Update: विठ्ठल रुक्मिणी मंदिर फुलांनी सजले

Metro In Dino Cast Fees: रोमँटिक म्युझिकल ड्रामा 'मेट्रो इन डिनो' चित्रपटातील कलाकारांचे मानधन किती?

SCROLL FOR NEXT