Deenanath Mangeshkar Hospital Tanisha Bhise death case Saam Tv News
मुंबई/पुणे

Tanisha Bhise Case: तनिषा भिसे मृत्यू प्रकरण चौकशी अहवालात ‘ससून’ चा हलगर्जीपणा?

Sassoon Hospital: तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात महत्वाची माहिती समोर आली आहे. पुणे पोलिसांनी या प्रकरणाचा चौकशी अहवाल देणाऱ्या ससून रुग्णालयाला अनेक प्रश्न विचारले आहेत. त्यानंतर ससून रुग्णालयाने सुधारित अहवाल पाठवला.

Priya More

अक्षय बडवे, पुणे

तनिषा भिसे प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. तनिषा भिसे मृत्यू प्रकरण चौकशी अहवालामध्ये ससून रुग्णालयाने हलगर्जीपणा केल्याची माहिती समोर आली आहे. पुणे पोलिसांच्या पत्रानंतर खळबळ उडाली आहे. पुणे पोलिसांच्या या पत्रानंतर मूळ मुद्द्यावर अभिप्राय मागवण्यात आला. पोलिसांच्या रेट्यानंतर एका दिवसात ससून रग्णालयाला शहाणपण आले. पुणे पोलिसांनी अहवालावर चार मुद्द्यांवर अभिप्राय मागितल्यानंतर ससूनने सुधारित अहवाल दिल्याची माहिती समोर आली आहे.

तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात दिनानाथ मंगेशकर रुग्णालय आणि डॉ. सुश्रृत घैसास यांना क्लीन चीट देणारे ससून रुग्णालय यांचा हा हलगर्जीपणा का की तो मुद्दाम केला गेला? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात पुणे पोलिसांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. हाय रिस्क स्थिती असूनही उपचारात दिरंगाई? रुग्णाची प्रकृती गंभीर असूनही, डॉ. घैसास यांनी तात्काळ उपचार न करता वेळ दवडल्याने परिस्थिती अधिक बिघडली का? पाच तासांहून अधिक वेळ उपचाराशिवाय? रुग्णाला दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल झाल्यावर पाच तासांपेक्षा अधिक वेळ ओपीडीच्या अ‍ॅसेसमेंट रूममध्ये ठेवण्यात आले, मात्र कोणतेही वैद्यकीय हस्तक्षेप न केल्याने रुग्णाने तेथून निघून जाण्याचा निर्णय घेतला का?, असे प्रश्न पुणे पोलिसांनी ससून रुग्णालयाला विचारले आहेत.

तसंच, डिपॉझिट न मिळाल्याने उपचार न करण्याचा निर्णय घेतला का? उपचाराधी मुदतपूर्व प्रसूतीसाठी बाळांना ‘एनआयसीयू’मध्ये ठेवण्यासाठी १० लाख रुपये डिपॉझिटची मागणी नातेवाईकांकडून करण्यात आली होती. डिपॉझिट न मिळाल्याने उपचार न करण्याचा निर्णय घेतल्याचेही नमूद करण्यात आले आहे का? असे अनेक प्रश्न पुणे पोलिसांनी उपस्थित केले. पुणे पोलिसांनी या सर्व मुद्द्यांवर अभिप्राय मागितल्यानंतर ससून रुग्णालयाला जाग आली आणि त्यांनी तात्काळ सुधारित अहवाल दिला.

दरम्यान, तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात आणखी एक महत्वाची माहिती समोर आली आहे. डॉ. सुश्रुत घैसास सोमवारी मेडिकल कौन्सिल समोर सुनावणीला गैरहजर राहीले. डॉ. सुश्रुत घैसास हे ईमेलवरून त्यांची बाजू मांडणार आहेत. मेडिकल कौन्सिल यांच्यातर्फे काल मुंबईत सुनावणी ठेवली होती. या सुनावणीला डॉ घैसास हजर राहिले नव्हते. डॉ सुश्रुत घैसास यांच्यासह दीनानाथ रुग्णालयातील चार जणांची सनद रद्द करावी ही भिसे कुटुंबियांची मागणी आहे. दिनानाथ रुग्णालयाच्या अहवालात तनिषा भिसे यांची खासगी माहिती प्रसारित केल्याने कुटुंबियाने तक्रार दाखल केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! CSMT स्टेशनवर रेल्वे कर्मचाऱ्यांचं आंदोलन; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

कुंभमेळ्यात फक्त हिंदूंचीच दुकानं लागली पाहिजेत; मंत्री नितेश राणे यांचं वक्तव्य चर्चेत|VIDEO

Money Astro Tips: पैसा हातात राहत नाही? तुमच्या या सवयी ठरतील कारणीभूत

Maharashtra Live News Update: सीएसएमटी स्थानकात रेल्वे कर्मचाऱ्यांचे आंदोलन

प्रोफेशनल कोर्सेसमधून 10,000 कोटींची लूट? विद्यार्थ्यांवर आत्महत्येची वेळ, शुल्कनियमक प्राधिकरणावर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT