Tanaji Sawant News Saam TV
मुंबई/पुणे

Tanaji Sawant : बँकॉक जाणारे मुलाचे चार्टर्ड विमान रोखण्यासाठी तानाजी सावंतांनी कुणाला फोन केला? समोर आली मोठी अपडेट

Tanaji Sawant son : मुलाचे चार्टर्ड विमान रोखण्यासाठी तानाजी सावंत यांनी सर्वस्व पणाला लावलं. त्यातून पुणे-बँकॉक चार्टर्ड विमान हे चेन्नईत थांबवण्यात आले.

Namdeo Kumbhar

अक्षय बडवे

Tanaji Sawant News : माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या मुलाचे कथित अपहरण नाट्य सोमवारी संध्याकाळी चांगलेच चर्चेत आले होतं. सावंत यांचा मुलगा ऋषिराज हा कुणालाही न सांगता मित्रांसोबत बँकॉकला निघाला होता. त्यासाठी त्याने ६८ लाख रूपयांचे खासगी विमान बुक केले होते. पण मुलगा अचानक गायब झाल्यामुळे सावंत कुटुंबात खळबळ उडाली. मुलाचे अपहरण झाल्याचं वाटलं, त्यामुळे तात्काळ पोलिसांत गुन्हा दाखल केला.

पोलिसांच्या तपासात ऋषिराज बँकॉकला जात असल्याचे समजले. मुलाचे चार्टर्ड विमान रोखण्यासाठी तानाजी सावंत यांनी सर्वस्व पणाला लावलं. त्यातून पुणे-बँकॉक चार्टर्ड विमान हे चेन्नईत थांबवण्यात आले. तानाजी सावंत यांनी दोन महत्त्वाच्या नेत्यांना फोन केले असल्याची माहिती समोर आली आहे. तानाजी सावंत यांचा मोठा मुलगा गिरीराज यांनी साम टीव्हीसोबत बोलताना याबाबत उलगडा केलाय. तानाजी सावंत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याशी संपर्क केला होता, असे गिरीराज सावंत यांनी सांगितले.

पोलिसांत तक्रार का केली ?

सोमवारी दुपारी साडेतीन वाजता ऋषिराज यांच्या पत्नीने तो बाहेर निघाला असल्याचे सांगितले.पण तो कुठे निघाला? सोबत कोण होतं? याबाबत आम्हाला काही माहिती नव्हते.त्यात त्याचा मोबाईल बंद होता.तासभर आम्ही माहिती घेतली, पण काहीच समोर येत नव्हते.त्यामुळे आम्ही सिंहगड पोलिसांत अपहरणाची तक्रार दाखल केली,असे गिरीराज यांनी सांगितले.

सरकारकडून मदत, झटक्यात शोध

तो गायब झालेला आहे. त्याचा फोन लागत नव्हता. लोकेशन स्ट्रेस होत नव्हतं. तो कुठे गेलाय हे ड्रायव्हरलाही माहिती नव्हते. त्यामुळे आम्ही पोलिसांत तक्रार दाखल केली. गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांकडून तात्काळ शोध घेण्यात आला. ऋषिराज पुमे विमानतळावरून बँकॉकला जात असल्याचे पोलिसांना समजलं. त्याच्यासोबत दोन मित्र होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या मदतीने ऋषिराज याला संपर्क साधला, असे गिरीराज सावंत म्हणाले.

न सांगता दुबईला का गेला ?

आठ दिवसांपूर्वी ऋषिराज दुबाईला गेला होता. त्यानंतर त्याचा लगेच व्यवसायाच्या निमित्ताने बँकॉकला जाण्याचा प्लॅन होता. घरचे लगेच परवानगी देणार नाहीत, त्यामुळे त्याने न सांगता जाण्याचा प्लॅन केला. ऋषिराज न सांगता कधीच कुठे जात नाही, त्यामुळे आम्ही सर्व हायपर झालो होतो. अपहरण झाल्याचा संशय आम्हाला आला, त्यामुळे पोलिसांत तक्रार दाखल केली, असे गिरीराज सिंह म्हणाले.

आमच्यात कोणताही वाद नाही ?

आमच्यामध्ये कोणताही वाद नाही. घरात खेळीमेळीचं वातावरण आहे. विरोधकांनी विनाकारण अफवा पसरवू नयेत. आमच्या घरात प्रॉपर्टी अथवा संपत्तीचा वाद नाही. ऋषिराजसोबत कोण होतं आम्हाला माहिती नव्हते, त्यामुळे आम्ही अपहरणाचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर आम्हाला समजले की तो मित्रांसोबत गेला होता, असे गिरीराज म्हणाले.

तक्रार कधी मागे घेणार ?

सोमवारी जे काही झालं, त्याबाबत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी वडिलांनी सर्वकाही सांगितले. मुख्यमंत्री वडिलांच्या संपर्कात होते. त्यांनी सहकार्य केले. सरकारच्या मदतीने ऋषिराज सुखरूप घरी आला.या प्रकरणावर पोलीस चौकशी करतील. पोलिसांचा तपास पूर्ण झाल्यानंतर आम्ही तक्रार मागे घेऊयात, असे गिरिराज यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Tourism : रिमझिम पाऊस अन् पांढराशुभ्र धबधबा, पुण्यात लपलंय अद्भुत सौंदर्य

Revdi Recipe: गूळ व तीळापासून तयार होणारी खमंग रेवडी एकदा घरी नक्की बनवा, नोट करा सिंपल रेसिपी

Pune : आषाढी एकादशीच्या दिवशी काळाचा घाला! पंढरपूरहून परतताना अपघात, टँकरची दुचाकीला धडक अन्...; हसताखेळता संसार उद्धवस्त

Food Digestion: खाल्लेले अन्न पचायला किती वेळ लागतो?

Farali Misal Recipe : झणझणीत फराळी मिसळ, उपवासाला एकदा करून तर बघा

SCROLL FOR NEXT