Taloja factory fire  Saam tv
मुंबई/पुणे

Taloja Godown Fire: तळोजामध्ये भंगार गोदामाला भीषण आग; अग्निशमन दलाचे ६ बंब घटनास्थळी, Video

Taloja Godown fire Update: रायगडच्या पनवेल तालुक्यातील तळोजामध्ये भंगार गोदामाला भीषण आग लागली आहे. आग लागल्याची माहिती मिळताचत अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचलं आहे.

Vishal Gangurde

सिद्धेश म्हात्रे, साम टीव्ही प्रतिनिधी

पनवेल : पनवेलमधील तळोजातून आगीचं वृत्त हाती आलं आहे. तळोजामध्ये भंगार गोदामाला भीषण आग लागली आहे. आग लागल्यानंतर अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचलं आहे. या आगीच्या घटनेमुळे गोदाम परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पनवेलच्या तळोजा येथील रोहिंजण टोल नाक्याजवळ भंगार गोदामाला भीषण आग लागली. गोदामाला भीषण आग लागल्यानंतर अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले आहेत.

अग्निशमन दलाचे ५ ते ६ बंब घटनास्थळी पोहोचले आहेत. गोदामाला लागलेली आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. या भीषण आगीमुळे परिसरात धुराचे लोट पसरले आहेत.

सोलापुरात फटाक्याच्या कारखान्याला आग

सोलापुरातील बार्शी तालुक्यातील घारी गावात फटाक्याच्या कारखान्याला भीषण आग लागली. कारखान्याला आग लागून झालेल्या स्फोटाचा परिसराला हादरा बसला. युन्नूस मुलाणी यांच्या मालकीच्या कारखान्याला ही आग लागली.

या कारखान्यात १५ महिला मजूर काम करतात. आज वटपौर्णिमेनिमित्त सुट्टी असल्याने कोणत्याही महिला कामाला गेल्या नव्हता. त्यामुळे सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या स्फोटाचा कारखाना मालकाला मोठा आर्थिक फटका बसला आहे.

या आगीच्या घटनेची माहिती मिळताच पांगरी पोलीस स्टेशनचे पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत. पोलिसांनी पुढील कारवाई सुरु केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : आमदार सुहास कांदे आणि समीर भुजबळ आज एकाच व्यासपीठावर

Earing Designs: रोजच्या वापरासाठी कानातल्यांचे हे 5 ट्रेडिंग डिझाईन्स, मकर संक्रांतीला नक्की खरेदी करा

...अजित पवारांचे पिंपरी चिंचवड शहरातील काही निर्णय चुकले', महेश लांडगे प्रकरणावर माजी आमदारांचं मोठं वक्तव्य

Valentine Day Love Letter: प्रिय मी..! मसला ये नही की... गम कितने है, मुद्दा ये है की... परवाह किसको है!

Accident : कोकणात फिरायला आलेल्या पर्यटकांचा भीषण अपघात; एकाचा जागीच मृत्यू, तिघे जखमी

SCROLL FOR NEXT