Narayan Rane Vs Shivsena | राणेंना ठाण्याच्या हॉस्पिटलमध्ये न्या, शॉक द्या... 
मुंबई/पुणे

Narayan Rane Vs Shivsena | राणेंना ठाण्याच्या हॉस्पिटलमध्ये न्या, शॉक द्या...

''नारायण राणेंना अटक करण्यापेक्षा त्यांना ठाण्याच्या हॉस्पिटलमध्ये न्या, गरज पडल्यास शॉकही द्या'' अशी बोचरी टीका गुलाबराव पाटील यांनी केली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने शिवसेना चांगलीच आक्रमक झालीय. भाजप नेते तथा मंत्री नारायण राणे यांनी काल रायगडमध्ये आयोजीत केलेल्या एका पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने शिवसैनिक संतप्त झाले आहेत. त्यामुळे शिवसेना नेत्यांकडून नारायण राणेंवर ठिकठिकाणी गुन्हे दाखल करत आंदोलन करण्यात येत आहे. आज शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांनी राणेंवर पुन्हा बोचरी टीका केली आहे. (Take Narayan Rane to Thane hospital, give him a shock said gulabrao patil)

हे देखील पहा -

''नारायण राणेंना अटक करण्यापेक्षा त्यांना ठाण्याच्या हॉस्पिटलमध्ये न्या, गरज पडल्यास शॉकही द्या'' असं गुलाबराव पाटील माध्यमांशी बोलताना म्हणाले. पुढे ते म्हणाले की, राणेंनी केंद्रीय मंत्री, माजी मुख्यमंत्री ही पदं भुषवलेली आहेत. मुख्यमंत्री पदाची गरीमा काय असते हे त्यांना चांगलंच माहित आहे. मुख्यमंत्री कुण्या एका पक्षाचा नसतो तर तो संपुर्ण राज्याचा असतो. मुख्यमंत्र्यांबद्दल काय बोलावं याचं भान राणेंना असलं पाहिजे. त्यामुळे राणेंना अटक करण्यापेक्षा त्यांना ठाण्याच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करा, गरज पडल्यास शॉकही द्या अशी बोचरी टीका त्यांनी राणेंवर केली आहे.

नारायण राणेंच्या वक्तव्यानंतर शिवसैनिक प्रचंड आक्रमक झाले आहेत. राज्यात ठिक-ठिकाणी राणेंविरोधात निदर्शनं केली जात आहेत. दादरमध्ये तर शिवसैनिकांनी नारायण राणेंचे पोस्टर लावत त्यावर कोंबडी चोर असं लिहीलंय. त्याचप्रमाणे नाशिकमध्ये राणेंवर गुन्हा दाखल झाला असून त्यांना अटक करण्यासाठी नाशिक पोलिस रवाना झाले आहेत. याबाबत राणेंचे सुपुत्र यांनी ट्विट करत शिवसेनेला आव्हान दिलं आहे. शिवाय राणेंना अटक केल्यास राज्याभर जेलभरो आंदोलन करु असं भाजपने म्हटलं आहे.

Edited By - Akshay Basiane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thane Rain Video: ठाण्यात मुसळधार पाऊस! पाण्यासोबत घरात शिरले साप | VIDEO

Maharashtra Rain Live News: कल्याण-कर्जत राज्य महामार्ग पाण्याखाली

कोणत्या जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे हिरड्यांमधून रक्तस्राव होतो?

Baramati Crime News : भेटण्यासाठी बोलावत केले भयानक कृत्य; तरुणाला नग्न करून बेदम मारहाण

शहरात फिरवलं अन् हॉटेलमध्ये नेऊन शारीरिक संबंध; शिवसेनेच्या माजी आमदारावर महिलेचे गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT