Nitesh Rane Controversial Statement Saam Tv
मुंबई/पुणे

Nitesh Rane Controversial Statement: राणेंवरून महायुतीत ठिणगी, अजित पवार गटाची फडणवीसांकडे पत्राद्वारे कारवाईची मागणी

Saam Tv

भाजप आमदार नितेश राणे यांनी गुरुवारी सांगलीतील ३२ शिराळा येथे एका भाषणात वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यानंतर राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. राणेंच्या वक्तव्यावर आता अजित पवार गट आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. यातच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे विधान परिषदेचे आमदार सतीश चव्हाण यांनी थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहीत नितेश राणे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

'नितेश राणेंवर कठोर कारवाई करा'

आमदार सतीश चव्हाण म्हणाले आहेत की, ''भाजपचे आमदार नितेश राणे वारंवार धार्मिक द्वेष वाढवणारी करणारी वक्तव्ये करत आहेत. त्यामुळे त्यांच्या वक्तव्याची चौकशी करुन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी.''

महाराष्ट्रामध्ये येत्या दोन महिन्यात विधानसभेच्या निवडणूका होऊ घातल्या आहेत. अशा पार्श्वभूमीवर केवळ स्वत:चे राजकारण करण्यासाठी भाजपचे आमदार नितेश राणे सातत्याने मुस्लिम समाजाबद्दल आणि त्यांच्या धार्मिक स्थळाबाबत वादग्रस्त वक्तव्ये करीत आहेत, असा आरोप आमदार सतीश चव्हाण यांनी केला आहे.

यामुळे मुस्लिम समाजात संतापाची भावना आहे. तसेच याबाबत त्यांच्यावर कायदेशीर गुन्हा देखील दाखल झाला आहे. मात्र असे असताना देखील ते पुन्हा तशाच पध्दतीची वक्तव्ये करीत आहेत. यामुळे दोन समाजात धार्मिक तेढ निर्माण होईल, अशी सामाजिक परिस्थिती तयार होण्याची शक्यता आहे. त्यातून गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते, असंही सतीश चव्हाण आपल्या पत्रात म्हणाले आहेत.

भाजपच्या शीर्ष नेतृत्वाने दखल घ्यावी

आमदार सतीश चव्हाण यांनी फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, आमदार राणे यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश द्यावेत. तसेच भाजपच्या शीर्ष नेतृत्वाने देखील त्यांच्या समाजविघातक वक्तव्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी फडणवीस यांच्याकडे केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Crime : किरकोळ वाद टोकाला गेला; दोन कुटुंबात लोखंडी रॉड आणि बांबूने तुफान हाणामारी, VIDEO

Fact Check: 99 रुपयांत मिळणार दारू? सरकारचं आणलं नवं मद्य धोरण? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य? वाचा...

Tirupati laddu news : तिरूपतीच्या लाडूंमध्ये चरबी, माशांचं तेल; आरोप-प्रत्यारोपांचा तडका, राजकीय फोडणी

Maharashtra Politics: मविआत मोठा भाऊ कोण? जागांवर अडले, भाऊ-भाऊ भिडले; मविआत जागावाटपावरून खडाजंगी

Budgam Bus Accident Video: काश्मीरमध्ये पुन्हा भीषण दुर्घटना; BSF जवानांनी खचाखच भरलेली बस खोल दरीत कोसळली, ४ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT