Swasthyam 2022, meditation pranayama
Swasthyam 2022, meditation pranayama  saam tv
मुंबई/पुणे

Swasthyam 2022 : सुदृढ आरोग्यासाठी पुण्यात 'स्वास्थ्यम्'; कधी, कुठे अन् कसे व्हाल सहभागी? जाणून घ्या

साम टीव्ही न्यूज नेटवर्क

Swasthyam 2022: सध्या आधुनिक आणि स्पर्धेचं युग आहे. यात टिकून राहण्यासाठी प्रचंड धावपळ करावी लागतेय. या धावपळीच्या आणि धकाधकीच्या जीवनात शरीर आणि मन थकून जातंय. ताणतणाव वाढतात. मानसिक आरोग्य बिघडतं. त्यातून नैराश्य वाढते. खूप प्रयत्न केले तरी त्यातून बाहेर पडणं शक्य होत नाही. अशावेळी शरीर आणि मन स्थिर ठेवण्यासाठी ध्यान-धारणा, प्राणायाम, योगासनं हा सर्वोत्तम उपाय समजला जातो. पण त्याचवेळी याबाबत नागरिकांना शास्त्रीय मार्गदर्शन मिळणं आवश्यक आहे.

ही गरज लक्षात घेऊन ‘सकाळ माध्यम समूहा’तील ‘वुई आर इन धिस टुगेदर’ मोहिमेंतंर्गत ९ ते ११ डिसेंबर दरम्यान पुण्यात तीन दिवसीय संपूर्ण आरोग्यासाठी ‘स्वास्थ्यम्’ उपक्रम आयोजित केला आहे. चार वेगवेगळ्या ठिकाणी हा उपक्रम होणार आहे. यात विविध क्षेत्रांतील अनेक नामवंत तज्ज्ञ मंडळी मार्गदर्शन करणार आहेत.

काय आणि कशासाठी आहे ‘स्वास्थ्यम्’?

ध्यान धारणेविषयी शास्त्रीय माहिती: माणसाला अनेक शारीरिक व्याधी असतात. त्या मनाच्या अस्वस्थतेमुळे. ताणतणाव, मनात विचारांचं वादळ, भीती, चिंता अशा अनेक कारणांनी शरीर आणि मन थकतं. आपल्या शरीराचे सर्व कार्य सुरळीत सुरू ठेवण्याची जबाबदारी मेंदूची असते, त्यासाठी मेंदूची क्रिया किंवा त्याचे कार्य संतुलित राहणे गरजेचे आहे. त्यासाठी नियमित ध्यानधारणा आवश्यक आहे.

शरीर, इंद्रिये आणि निरोगी मनासाठी प्राणायाम : शरीराच्या विविध अवयवांतील प्राणाचे प्रमाण कमी-जास्त झाल्यानं शरिरात व्याधी निर्माण होतात. प्राणायामामुळे प्राणशक्ती संतुलित होते. व्याधींचा नाश होतो. नियमित प्राणायामाने शरीर, इंद्रिये आणि मन निरोगी राहण्यास मदत होते. प्राणायामाच्या माध्यमातून श्वास घेणे आणि श्वासावर नियंत्रण कसं मिळवावं हे जाणून घेऊ शकता. (Meditation)

उत्तम, निरोगी व तंदुरुस्त आरोग्यासाठी योगा : मानसिक, शारीरिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक या चार गोष्टींचं संतुलन म्हणजे उत्तम आरोग्य. योग या शास्त्रात मानसिक, शारीरिक आणि आध्यात्मिक या तीन गोष्टींचा समावेश होतो. या तीन महत्त्वपूर्ण गोष्टींनी मानवी जीवनाचं योग्य संतुलन राखलं जातं. (Health)

अध्यात्म आणि सुदृढ आरोग्य यांचा सहसंबंध : अध्यात्मातून माणूस स्वतःकडे पाहण्यास शिकतो. स्वतःकडे पाहिल्याने आत्मपरीक्षणाची सवय जडते. अध्यात्म हे लोकांना जीवनाचा अर्थ व सार सांगण्यासाठी, नैतिक मूल्ये रुजवण्यासाठी आणि चांगल्या संस्कारांचा स्वीकार करण्यासाठी मदत करतं. अध्यात्माचा सकारात्मक प्रभाव मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर होतो.

सकस आहार आणि आरोग्य : धकाधकीच्या जीवनात आपल्या शरीराकडे, आरोग्याकडे लक्ष देणे व संतुलित आहार घेणे गरजेचे आहे. मानवाच्या शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी शरीराला पौष्टिक व सात्त्विक आहाराची आवश्यकता असते. पौष्टिक आहार कमी किंवा अधिक प्रमाणात मिळाला तरी शरीरावर दुष्परिणाम होतो.

गायन, कला व संगीताचा आरोग्याशी संबंध : आपल्या आवडीचं गाणं किंवा संगीत ऐकलं की, मन प्रसन्न होतं, म्हणजे संगीताचा मनाशी संबंध आहे आणि मनाचा आणि गायन- संगीत कलेचा आपल्या आरोग्याशी संबंध आहे.

३ दिवस अन् या विषयांवर तज्ज्ञांचं मार्गदर्शन

- डॉ. हंसाजी योगेंद्र : योगासाठी सकस आहार आणि योगातून अध्यात्माकडे

- ख्यातनाम कवी, व्याख्याते कुमार विश्वास : कला आणि संस्कृतीच्या भारतीय प्रेरणा

- अध्यात्म गुरू संत श्री गौरांग दास : आनंदी जीवनाची कला

- योग गुरू श्री एम : योग, अनंत क्षमतेचा मार्ग

- नूपुर पाटील : सकस, जैविक आहार आणि आरोग्य

- प्रियंका पटेल : इमर्सिव्ह साउंड्स : साउंड हीलिंग कार्यशाळा

- अभिनेत्री शिल्पा शेट्टी : कीप इट सिम्पल- योगा आणि फिटनेस

- सर्वेश शशी : योगा, फिटनेस आणि त्यापलीकडे

- अॅक्शन दिग्दर्शक चित्ता शेट्टी : मार्शल आर्ट्सद्वारे शारीरिक तंदुरुस्ती व स्वास्थ्य

- सूफी गायिका रुहानी सिस्टर्स व शास्त्रीय संगीतकार उस्ताद राशीद खान : मानसिक स्वास्थ्यासाठी संगीत व गायन

- डॉ. राजेंद्र बर्वे : आजची नवीन सामान्य स्थिती आणि मन

- ‘वेड’ चित्रपटाचे दिग्दर्शक व अभिनेते रितेश देशमुख व अभिनेत्री जिनिलिया देशमुख: लाफ्टर इज द बेस्ट मेडिसिन

‘स्वास्थ्यम्’मध्ये सहभागी व्हा! त्यासाठी काय कराल?

‘स्वास्थ्यम्’ या नावीन्यपूर्ण उपक्रमात सर्व वयोगटातील आणि विविध क्षेत्रातील नागरिक सहभागी होऊ शकतात. तसेच योग, प्राणायाम, अध्यात्म, तंदुरुस्ती आदी क्षेत्रांत कार्यरत असलेल्या विविध संस्था, ग्रुप्स यांनाही सहभागी होता येईल. त्यासाठी खालील वेबसाइट ओपन करून किंवा सोबतचा क्यूआर कोड स्कॅन करून रजिस्र्टेशन करू शकता.

Website: https://globalswasthyam.com

- व्यक्तिगत सहभागासाठी : व्यक्तीचे नाव, वयोगट, पत्ता, नोकरी /व्यवसाय व संपर्क क्रमांक

- संस्था व ग्रुपच्या सहभागासाठी : स्वयंसेवी तसेच व्यावसायिक संस्था, ग्रुपचे नाव, कार्य व प्रकल्पाची माहिती, पत्ता व संपर्क क्रमांक

उपक्रमाच्या माहितीसाठी व अपडेट मिळविण्यासाठी वेबसाइट व खालील सोशल मीडिया पेजेसला भेट द्या !

Facebook: https://www.facebook.com/globalswasthyam

Instagram: https://www.instagram.com/globalswasthyam/

Twitter: https://twitter.com/GlobalSwasthyam

LinkedIn: https://www.linkedin.com/company/global-swasthyam

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sharad Pawar: रायगडमध्ये शरद पवारांच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड, पुढील प्रवासासाठी रस्ते मार्गे रवाना

Bhandup News: धक्कादायक! भांडुपमध्ये टॉर्च लावून गर्भवतीची प्रसूती, आईसह बाळाचा मृत्यू

Aditi Rao Hydari : अदिती राव हैदरीचा क्लासी अंदाज, सौंदर्यावरून नजर हटेना

Today's Marathi News Live : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु उद्या अयोध्येत प्रभू श्रीराम चंद्राचं घेणार दर्शन

T20 World Cup 2024 Squad: आयपीएल गाजवणाऱ्या या ५ खेळाडूंना BCCI ने केलं इग्नोर! यादीत दिग्गज खेळाडूंचा समावेश

SCROLL FOR NEXT