Dattatray Gade swargate bus st depot case saam tv
मुंबई/पुणे

Pune News: व्हिडिओ काढून महिलांना ब्लॅकमेल करायचा, मोबाईल शोधण्यासाठी पोलीस दत्ता गाडेच्या गावात

Police investigation in Gunat village: पुणे पोलिसांचे पथक आरोपी दत्ता गाडेचा मोबाईल शोधण्यासाठी त्याच्या गुनाट गावी जाणार आहेत. आरोपीच्या मोबाईलमधून अनेक पुरावे समोर येतील, अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

Bhagyashree Kamble

स्वारगेट बलात्कार प्रकरणात अटकेत असलेला दत्ता गाडे स्वारगेट पोलिसांच्या ताब्यात आहे. गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक शैलेश संखे यांच्याकडे याप्रकरणाचा तपास देण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलिसांकडून सुरू आहे. आता पोलीस आरोपीचा मोबाईल शोधण्यासाठी गुनाट गावी जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

आरोपी दत्ता गाडेला अटक झाल्यानंतर त्याच्या संदर्भात अनेक बाबी समोर आल्या आहेत. आरोपी हा सराईत गुन्हेगार असून, तो स्त्रीलंपट असल्याची माहिती समोर आली आहे. त्यानं या आधीही अनेक महिलांना आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला. स्वारगेट बस डेपोमध्ये जात येणाऱ्या जाणाऱ्या महिलांवर त्याचा डोळा असायचा.

दत्ता गाडे महिलांचे नंबर मिळवून आमिष दाखवायचा. मोबाईलमधून महिलांना संपर्क साधण्याचा प्रयत्न करायचा. तसेच लॉजबाहेर व्हिडिओ शुट करून महिलांना ब्लॅकमेल करायचा. त्यामुळे दत्ता गाडेच्या मोबाईलमध्ये आणखी पुरावे सापडण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

आरोपी दत्ता गाडेनं त्याचा मोबाईल गुनाट गावातील उसाच्या शेतात लपवून ठेवलं असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक आणि त्यांचे पथक गुनाट गावात जाऊन आरोपी ज्या ठिकाणी लपला होता, त्या उसाच्या शेतात जाऊन आरोपीचा मोबाईल जप्त करून त्याची तपासणी करणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

एमआयएम-काँग्रेस युती, ड्रग्स ते बदलापूर बलात्कार प्रकरणाचा आरोपी नगरसेवक, राज ठाकरेंनी भाजपचे कपडेच फाडले|VIDEO

Raj Thackeray: राज ठाकरेंनी अदानींचा दाखवला 'तो' व्हिडिओ; Video पाहताच अख्खा महाराष्ट्र हादरला

Mumbai Politics: शिवाजी पार्कवर सभा, दुसरीकडे निष्ठावंत शिलेदाराचा भाजपात प्रवेश; राज ठाकरेंना मोठा धक्का

Monday Horoscope: कुटुंबातील कटकटी मिटतील, घरात येईल सुख समृद्धी, जाणून घ्या कसा असेन सोमवारचा दिवस

Monday Horoscope: पैशाची तंगी होईल दूर, ४ राशींना करावा लागेल खूप प्रवास, वाचा सोमवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT