Swargate bus depot News  Saam tv
मुंबई/पुणे

Pune News : पुण्यातील पीडित तरुणीचा मेडिकल रिपोर्ट आला समोर

Pune Latest News : पुण्यातील पीडित तरुणीचा मेडिकल रिपोर्ट समोर आला आहे. या पोलिस अहवालातून अनेक गोष्टी समोर येण्याची शक्यता आहे. वाचा सविस्तर

Vishal Gangurde

नितीन पाटणकर, साम टीव्ही

पुणे : पुण्याच्या स्वारगेट डेपोत शिवशाही बसमध्ये तरुणीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेने खळबळ उडाली आहे. पुण्यातील या घटनेने सर्वत्र संताप व्यक्त केला जातोय. तरुणीवरील अत्याचार प्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या प्रकरणातील पीडित तरुणीचा मेडिकल रिपोर्ट समोर आला आहे. मेडिकल रिपोर्ट पोलिसांना देण्यात आला आहे. या मेडिकल रिपोर्टकडे साऱ्यांचे लक्ष लागलं आहे.

पुण्यातील स्वारगेटमधील डेपोमध्ये २६ वर्षीय तरुणीवर अत्याचाराची घटना घडली. अत्याचाराची घटना घडल्यानंतर तरुणीने पोलिसांत धाव घेतली. पोलिसांत तक्रार नोंदवल्यानंतर काही वेळेनंतर वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात नेण्यात आलं. त्यानंतर आता पीडित तरुणीचा मेडिकल रिपोर्ट समोर आला आहे.

मेडिकल रिपोर्ट पोलिसांना देण्यात आला आहे. ससून रुग्णालयाने पीडित तरुणीचा वैद्यकीय अहवाल पोलिसांना सुपूर्द केला आहे. मेडिकल रिपोर्टमधून अनेक गोष्टी स्पष्ट होणार आहेत. पोलिसांना तपासात मेडिकल रिपोर्टची मदत होणार आहे. या मेडिकल रिपोर्टमुळे कोण-कोणते खुलासे होणार, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.

स्वारगेटमध्ये बसमध्ये अत्याचार झालेल्या पीडित तरुणीला आज पुन्हा पोलीस स्टेशनमध्ये आणलं. पीडित तरुणीचा आज पुन्हा एकदा जबाब घेण्यात आला आहे. तरुणीवर अत्याचार झाल्यानंतर पोलिसांनी जबाब नोंदवला होता. त्यानंतर आज पुन्हा एकदा जबाब नोंदवण्यात आला आहे. पुण्यातील या प्रकरणामुळे महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: ऐन निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरेंना मोठा धक्का; निष्ठावंत नेत्यानं सोडली साथ

Maharashtra Live News Update: मुद्रांक शुल्क आणि त्यावरचा दंड भरल्यावरच व्यवहार पूर्णपणे रद्द होणार

Manoj Jarange: जरांगेंच्या हत्येचा कट? एक-दोन नव्हे, तीन-तीन प्लान आले समोर

रेल्वेचे खुनी कर्मचारी,आठ प्रवाशांचे हत्यारे मोकाट, माजुरड्या कर्मचा-यांवर कारवाई कधी?

Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; धडकेनंतर कारनं घेतला पेट, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT