Sushma Andhare on Amit Shah Saam Tv
मुंबई/पुणे

Sushma Andhare : 'औरंगजेब फॅन क्लबचे नेते', अमित शहांची उद्धव ठाकरेंवर सणसणीत टीका; सुषमा अंधारे यांनी दिले जशास तसे उत्तर

Sushma Andhare on Amit Shah : उद्धव ठाकरे हे औरंगजेब फॅन क्लबचे नेते आहेत, अशी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज पुण्यात केली. यालाच आता सुषमा अंधारे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

Satish Kengar

गिरीश कांबळे, साम टीव्ही, प्रतिनिधी

उद्धव ठाकरे हे औरंगजेब फॅन क्लबचे नेते आहेत, अशी घणाघाती टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज पुण्यात भाजपच्या महाराष्ट्र अधिवेशनाचा कार्यक्रमात केली. यालाच आता ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत की, ''अमित शहा यांनी पुण्यामध्ये येऊन जी मुक्ताफळे उधळली त्यावरून दोन मुद्दे नक्कीच स्पष्ट झाले. त्यातला पहिला भाग म्हणजे आजही अमित शहा यांना महाराष्ट्रात आल्यानंतर आपलं भाषण चुरचुरीत करण्यासाठी जाणीवपूर्वक उद्धव ठाकरे यांचं नाव घेतल्याशिवाय भाषण सुरूही करता येत नाही आणि संपवताही येत नाही.''

अंधारे म्हणल्या, ''याचा स्पष्ट अर्थ असा आहे की, तुमच्या समोर महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं आव्हान हे उद्धव बाळासाहेब ठाकरे या नावाचं आहे.

सुषमा अंधारे पुढे म्हणाल्या की, ''ज्या पद्धतीची अत्यंत खालच्या पातळीची भाषा आज तुम्ही पुण्यामध्ये केली, त्यावरून तुम्ही हे सप्रमाण सिद्ध केले की, लोकसभेत तुमच्या पक्षाचे खासदार रमेश बिधुरी यांनी जी सवंग भाषा केली होती, त्याच्याही पेक्षा अधिक निम्नतम-स्तर अमित शहा तुम्ही आज पुण्यामध्ये येऊन गाठला आहे.''

काय म्हणाले होते अमित शाह?

आज पुण्यात भाजपच्या सभेत उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत उद्धव ठाकरे म्हणाले की, 'औरंगजेब फॅन क्लब भारताची सुरक्षा सुनिश्चित करू शकत नाही. या औरंगजेब फॅन क्लबचे नेते उद्धव ठाकरे आहेत. ते कसाबशी संबंधित असलेल्या लोकांसोबत एका ताटात जेवतात, ते पीएफआयला पाठिंबा देत असून औरंगाबादचे संभाजीनगर, असे नामकरण करण्याच्या विरोधात उभे आहेत आहे. हा फॅन क्लब महाराष्ट्र आणि भारत सुरक्षित करू शकत नाही. केवळ भाजपच सर्वांची सुरक्षा सुनिश्चित करू शकतो.''

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

DR. MC Dawar Death : आधी २ रुपये, आता २० रुपयांमध्ये करायचे उपचार; गरीबांचे डॉक्टर पद्मश्री एमली डावर काळाच्या पडद्याआड

Maharashtra Politics: सुषमा अंधारे अन् कुणाल कामराच्या अडचणीत वाढ; विधिमंडळात हक्कभंग प्रस्ताव मंजूर

Maharashtra Live News Update: वाल्मीक कराडची पोलखोल करणाऱ्या विजयसिंह बांगर यांनी घेतली अप्पर पोलीस अधीक्षकांची भेट

Auto Rickshaw Bag : बाजारात आलीये नवीन ऑटो रिक्षा बॅग, फॅशनचा नवा ट्रेंड

Somnath Suryawanshi: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणाला नवं वळण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश|VIDEO

SCROLL FOR NEXT