मुंबई/पुणे

Supriya Sule News : 'वैयक्तिक कामांसाठी दिल्लीची वाट दिसते, पण शेतकऱ्यांना मदतसाठी...'; सुप्रिया सुळेंचा राज्य सरकारवर निशाणा

Supriya Sule News : शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी यांना दिल्ली दिसत नाही ही मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे, अशी टीका देखील सुप्रिया सुळे यांनी राज्य महायुती सरकारवर केली आहे.

प्रविण वाकचौरे

Mumbai News :

राज्यातील शेतकरी एकीकडे दुष्काळ आणि दुसरीकडे अवकाळी पाऊस अशा दुहेरी संकटात सापडला आहे. सलग दोन दिवस झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपीटीने शेतपिकांचं मोठं नुकसान झालं आहे. राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने सरसकट कर्जमाफी द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

पालकमंत्रीपदाची भांडणं सोडवायला दिल्लीची वाट दिसते, पण शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी यांना दिल्ली दिसत नाही ही मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे, अशी टीका देखील सुप्रिया सुळे यांनी राज्य महायुती सरकारवर केली आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

सुप्रिया सुळे यांनी ट्वीट करत म्हटलं की, महाराष्ट्रातील शेतकरी दुष्काळ आणि अवकाळी पावसामुळे अतिशय अडचणीत सापडला आहे. अशावेळी शासनाने त्यांना मदतीचा हात देऊन उभा करायला हवे. परंतु सत्ताधाऱ्यांना शेतकऱ्यांची कसलीही काळजी नाही असे स्पष्ट दिसते.

पालकमंत्रीपदाची भांडणं सोडवायला दिल्लीची वाट दिसते पण शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी यांना दिल्ली दिसत नाही ही मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे.

जेव्हा या सरकारमधील नेत्यांची वैयक्तिक कामे असतात तेव्हा विनाविलंब ते दिल्लीला पळतात. मग शेतकऱ्यांना जेव्हा गरज आहे तेव्हा यांना दिल्लीचं तिकीट मिळत नाही का? असा सवाल सुप्रिया सुळे यांनी सरकारला विचारला आहे.

महाराष्ट्र सरकारने दिल्लीत जाऊन शेतकऱ्यांसाठी तातडीने मदत आणली पाहिजे व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी दिली पाहिजे, अशी मागणी देखील त्यांनी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Skin Care : तुम्हालाही चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो हवाय? मग 'हा' फेसपॅक नक्कीच ट्राय करुन बघा

Pune Tourism : मराठ्यांच्या शौर्याचे साक्षीदार पुण्यातील 'हे' ८ किल्ले, करा इतिहासाची उजळणी

Shocking: सॉरी मम्मी-पापा! ३ सख्ख्या बहिणींची आत्महत्या, मध्यरात्री ९ व्या मजल्यावरून मारल्या उड्या, कारण वाचून शॉक बसेल

Rosemary Oil For Hair: लांब आणि दाट केसांसाठी लावा रोझमेरी तेल, आठवडाभरातच दिसेल फरक

Lagnanantar Hoilach Prem : "लग्नानंतरचे प्रेम दिसेल..."; जीवा-नंदिनी अन् काव्या-पार्थच्या नात्याची होणार नवीन सुरुवात, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT