Supriya Sule Bhaubij Celebration Saam tv
मुंबई/पुणे

Supriya Sule Bhaubij Celebration: ओवाळीते भाऊराया! गटाचा वाद विसरून सुप्रिया सुळेंकडून अजित पवारांचं औक्षण

Supriya Sule Bhaubij Celebration: राष्ट्रवादी गटाचा वाद विसरून खासदार सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं भाऊबीजनिमित्त औक्षण केलं.

मंगेश कचरे

Supriya Sule Bhaubij Celebration:

राष्ट्रवादी गटाचा वाद विसरून खासदार सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं भाऊबीजनिमित्त औक्षण केलं. सुप्रिया सुळे आणि त्यांच्या सर्व बहिणींनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं औक्षण केलं. सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांच्या काटेवाडीत हे औक्षण केलं. सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्या भाऊबीजेच्या कार्यक्रमाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. (Latest Marathi News)

पवार कुटुंबीयांच्या यंदाच्या दिवाळीकडे साऱ्यांचं लक्ष लागलं होतं. पक्षात फूट पडल्यानंतर पवार कुटुंबीयांची पहिली दिवाळी आणि भाऊबीज झाली. मोठ्या आनंदाने पवार कुटुंबीय दिवाळीनिमित्त एकत्र आल्याचं दिसून आलं. राजकीय मतभेद बाजूला ठेवत पवार कुटुंबीयांनी आज बुधवारी काटेवाडीमध्ये भाऊबीज साजरी केली. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या काटेवाडी गावात पवार कुटुंबीयांचा भाऊबीज कार्यक्रम उत्साहात पार पडल्याचे दिसले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना खासदार सुप्रिया सुळे आणि सर्व बहिणींनी औक्षण केले. अजित पवार यांच्या पाठोपाठ यांचे बंधू श्रीनिवास पवार, उद्योजक रणजीत पवार , जयंत पवार यांना सर्व बहिणींनी औक्षण केले.

राजकीय मतभेद, दिवाळीची परंपरा कायम

दरवर्षी पवार कुटुंबीय दिवाळीनिमित्त बारामतीत एकत्र येतात. यावर्षीही पवार कुटुंबीय एकत्र आलं. पक्ष फुटीनंतरही सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांनी भाऊबीज केली. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पवार कुटुंबाची पहिल्यांदा दिवाळी साजरी केली. दिवाळी पाडव्यालाही पवार कुटुंब एकत्र आलं.सुप्रिया सुळे यांनी पाडव्याला रात्री उशीरा एकत्रित कुटुंबाचा फोटो शेअर केला.

पक्ष आणि चिन्हाचा वाद पोहोचला निवडणूक आयोगात

शरद पवार यांनी स्थापन केलेल्या राष्ट्रवादीवर अजित पवार गटाने दावा केला आहे. त्यामुळे दोन्ही गटाचा वाद केंद्रीय निवडणूक आयोगात पोहोचला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अकोला शहरातील हरिहरपेठ भागात दोन गटात दगडफेक

Ganesh Visarjan: गणेशोत्सवाला गालबोट! विसर्जन करताना इंजिनिअरिंगच्या २ विद्यार्थ्यांचा मृत्यू

Famous Actress : प्रसिद्ध अभिनेत्रीची तब्येत बिघडली; रुग्णालयात दाखल, चाहते चिंतेत

Hill Station: मडगावपासून फक्त 2 किमी अंतरावर आहे हे हिल स्टेशन; मुंबईकरांचं फेव्हरेट डेस्टिनेशन

konkan Beach : महाराष्ट्रातील मिनी मालदीव! कोकणातील समुद्राच्या सौंदर्याला तोड नाही, एकदा फेरफटका माराच

SCROLL FOR NEXT