Supriya sule  saam tv
मुंबई/पुणे

मला एकनाथ शिंदे यांची काळजी वाटते कारण...; सुप्रिया सुळेंना वाटतेय चिंता

या राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा अपमान मी सहन करणार नाही - सुप्रिया सुळे

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुणे - पुणे महापालिकेच्या समाज विकास विभागमार्फत महिला बचत गटातील महिलांसाठी विविध कोर्सेस शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या शिबिरात सहभागी झालेल्या महिलांना सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि रुपाली चाकणकर यांच्या हस्ते प्रमाणपात्र वाटप करण्यात आले. यावेळी सुप्रिया सुळे यांनी भाजप (BJP) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर जोरदार टीका केली.

हे देखील पाहा -

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची काळजी वाटते. कारण मला वाटतं की त्यांच्यामागे मोठं षडयंत्र सुरु आहे. एकनाथ शिंदे यांना मुद्दामून प्रॉम्प्टिंग करणे, त्यांना चिठ्ठी पाठवणे यातून मुख्यमंत्र्यांना कमी दाखवण्याचा प्रयत्न उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करत आहेत. या राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा अपमान मी सहन करणार नाही असे विधान सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

नवीन आलेलं सरकार हे कन्फ्युज्ड सरकार आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा अपमान होणाऱ्या अनेक गोष्टी चॅनल वर दिसत आहे. हे महाराष्ट्राला शोभणारं नाही. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा अपमान म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेचा अपमान आहे. या राज्याचा मुख्यमंत्री कोणत्या पक्षाचा नसतो तो राज्याचा मुख्यमंत्री असतो. माझ्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सातत्याने अपमान करत असेल तर माझा स्वाभिमान जागा आहे आणि जागा राहिली. दिल्लीपुढे हा महाराष्ट्र कधीही झुकलेला नाही आणि झुकणार नाही असे देखील सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune : पुण्यात वाहतुकीत मोठा बदल! 'या' महत्त्वाच्या मार्गावरील वाहतूक २ तास राहणार बंद; पर्यायी मार्ग कोणते? जाणून घ्या

Dal Benefits : हृदय अन् मेंदूसाठी वरदान! रोज मूठभर खा 'ही' डाळ, ७ फायदे वाचून व्हाल थक्क

Maharashtra News Live Update: कोरडा दुष्काळ जाहीर करा! स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक

RuPay आणि UPI यूजर्ससाठी गुड न्यूज! ₹2,000 पर्यंतचे पेमेंट फ्री, नंतर चार्ज लागणार; सरकारचा मोठा निर्णय

गणपतीच्या नैवेद्यासाठी केळीचे पानच का वापरतात? वाचा धार्मिक महत्व

SCROLL FOR NEXT