Supreme Court
Supreme Court Saam TV
मुंबई/पुणे

BMC वॅार्ड रचनेसह नगर परिषदांच्या OBC आरक्षणाबाबत आज सर्वोच्च न्यायालयात महत्वाची सुनावणी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

शिवाजी काळे -

नवी मुंबई: मुंबई महानगरपालिकेसह (BMC) राज्यातील सर्व महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदांच्या सदस्य संख्येत केलेल्या बदलासंदर्भात आणि राज्यातील ९२ नगर पालिकेत प्रलंबित असलेल्या ओबीसी आरक्षणाच्या (OBC Reservation) याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी पार पडणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) यापूर्वी 92 नगरपालिकांच्या निवडणुका या ओबीसी आरक्षणाविना घेण्याचे निर्देश 28 जुलै 2022 रोजी दिले होते. सदर आदेशाचे पुनर्विलोकन करण्याचा अर्ज राज्य शासनामार्फत सर्वोच्च न्यायालयात सादर करण्यात आला आहे.

या सुनावणीदरम्यान २८ सप्टेंबरला झालेल्या गेल्या सुनावणीत नव्यानं दाखल झालेल्या याचिका संदर्भात राज्य सरकारला कोणतीही नोटीस पाठवण्यात आली नव्हती. त्यामुळे प्रतिज्ञापत्र दाखल करण्यासाठी राज्याकडून सर्वोच्च न्यायालयात दोन आठवड्यांचा कालावधी मागितला होता.

पााह व्हिडीओ -

ओबीसी राजकीय आरक्षण प्रकरणातच महापालिका सदस्य संख्येतील बदला संदर्भातचा अर्ज दाखल झाला आहे. त्यावरती देखील आज सुनावणी पार पडणार आहे. राज्यातील २३ महानगरपालिका आणि २०७ नगरपालिका, २५ जिल्हा परिषद, २८४ पंचायत समितीच्या सदस्यसंख्येत बदल करताना ठाकरे सरकारने कोरोनामुळे जनसंख्या उपलब्ध नसल्याने लोकसंख्येतील सरासरी १० टक्के वाढ लक्षात घेता सदस्य संख्येत वाढ केली होती.

शिंदे सरकारने मागील ठाकरे सरकारने लोकसंख्या वाढ गृहीत धरून केलेले बदल गृहीत न धरता नव्याने राज्यात सत्तेत आलेल्या शिंदे सरकारने पुर्वी जी प्रभाग रचना होती. ती स्थिती जैसे थे केली होती. ठाकरे सरकारने २०२१ मध्ये मुंबई महानगरपालिकेची सदस्य संख्या २२७ वरून २३६ केली होती. त्यानंतर नवीन सरकारने ही संख्या २३६ वरून २२७ केली होती.

ठाकरे सरकारने २०२१ ला कोरोनामुळे (Corona) जनगणना न झाल्याने गेल्या जनगणनेच्या आधारावर मुंबई महापालिकेची सदस्य संख्या २२७ वरून २३६ केली होती. २०१२ आणि २०१७ च्या महानगरपालिकेच्या निवडणूकांमध्ये सदस्य संख्येत कोणताही बदल न करता पार पडल्या होत्या म्हणून ठाकरे सरकारने २०११ च्या जनगणनुसार सदस्य संख्येत बदल केला होता.

तर दुसरीकडे राज्यात नवीन सरकार आल्यानंतर त्यांनी कायदा करत पुन्हा एकदा मुंबई महानगरपालिकेच्या सदस्य संख्या २३६ वरून २२७ केली होती. या दोनही प्रकरणाची सुनावणी आज सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमुर्ती धनंजय चंद्रचूड आणि न्यायमुर्ती हिमा कोहली यांच्या खंडपीठासमोर पार पडणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Business Idea: फक्त ५० हजार रुपयांमध्ये सुरू करा 'हा' व्यवसाय; दरमहा होईल बक्कळ कमाई

Bus Fire News: ईव्हीएम घेऊन जाणाऱ्या बसला भीषण आग, कर्मचाऱ्यांनी उड्या मारून वाचवला जीव; खळबळजनक घटना

Mumbai News: चिकन शोर्मा खाल्ल्याने अनेकांना विषबाधा; १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू, मुंबईतील खळबळजनक घटना

Zodiac Signs: 'या' ५ राशीच्या लोकांना नात्यापेक्षा Ego वाटतो महत्त्वाचा; क्षणात तोडतात नाती

Rain Alert : विदर्भ-मराठवाड्यात गारपिटीसह मुसळधार पाऊस कोसळणार; या जिल्ह्यांना झोडपणार, वाचा IMD अंदाज

SCROLL FOR NEXT