Sunil Toke
Sunil Toke Saam Tv
मुंबई/पुणे

सुनिल टोकेंवर पून्हा निलंबनाची कारवाई, बेशिस्त व अशोभनिय वर्तन केल्याचा ठपका

सुरज सावंत

मुंबई - वाहतूक पोलिसांच्या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करणारे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुनिल टोके यांच्यावर निलंबनाची (Suspension) कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्यावर करण्यात आलेली निलंबनाची ही दुसरी कारवाई आहे. यावेळी त्यांच्यावर माध्यम व वृत्त वाहिन्यांमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांविरोधात वारंवार खोट्या, तथ्यहिन व मोघम स्वरुपाचे आरोप करून स्वप्रसिद्ध प्राप्त करण्याचा प्रयत्न करीत असल्याने जन माणसात पोलिसांची (Police) प्रतिमा मलिन होतं आहे. त्यामुळे बेशिस्त व अशोभनिय वर्तन केल्याचा ठपका ठेवत त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

हे देखील पहा -

पोलीस दलातील भ्रष्टाचाराबद्दल जनहित याचिका करणारे, वरिष्ठांकडून होणाऱ्या अन्यायालाय वाचा फोडणारे आणि पोलिसांच्या गैरकृत्याबाबत सोशल मीडियातून जाहिरपणे मत मांडणारे अशी सुनिल टोकेंची ओळख आहे. वाहतूक विभागाला लागलेली भ्रष्टाचाराची कीड आणि खालपासून वरपर्यंत विषवल्लीसारखी पसरलेली लाचखोरी सुनिल टोके या वरळीच्या बी. डी. डी चाळीत राहणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याने उघडकीस आणायला सुरुवात केली आणि अवघ्या पोलिस दलात एकच हलकल्लोळ उडाला होता पोलिस दलातील विविध गोष्टींमध्ये खरेदी-विक्री दरम्यान होणाऱ्या भ्रष्टाचारावरही त्यांनी प्रकाश टाकला होता.

एवढ्यावरच न थांबता टोकेंनी न्यायालयात या सर्व प्रकरणांना आवाहन ही दिलं. टोके यांनी न्यायालयातही पोलीस दलातील भ्रष्टाचाराबाबत आपले मत मांडले. लाच स्वीकारण्याचं दरपत्रक, टोके यांनी स्वतः केलेल्या स्टिंग आॅपरेशनचे व्हिडिओ हे त्यांच्याकडे महत्वाचे पुरावे असल्याचा दावा ते करतात. यासंदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या सर्व प्रकरणाची चौकशी करून त्यावर विभागाच्या अतिरिक्त पोलीस महासंचालकांनी देखरेख ठेवावी, असे स्पष्ट निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले होते. दरम्यान ही प्रकरण न्यायप्रविष्ठित आहेत.

टोकेंनी आतापर्यंत भ्रष्टाचारा विरोधात ४ याचिका दाखल केल्या आहेत. दरम्यान दुसऱ्यांदा निलंबनाची कारवाई केली तरी भ्रष्टाचारा विरोधातला माझा लढा हा सुरूच राहणार, माझावर करण्यात आलेली कारवाई ही चुकीचे आहे. मी मोघंम आरोप केले नसून पुरावे पेनड्राइव्ह द्वारे देण्याची इच्छा दर्शवलेली. त्यामुळे निलंबनाच्या कारवाई विरोधात मी न्यायालयात दाद मागणार असल्याची माहिती टोकेंनी दिली आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघ 28 उमेदवारांचे अर्ज वैध

Amrita Pandey च्या मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण; पोस्टमॉर्टेम रिपोर्टमधून खळबळजनक खुलासा

Udayanraje Bhosale Acting | भर मंचावरुन उदयनराजे भोसले यांनी Shashikant Shinde यांची नक्कल केली?

Gopichand Padalkar On Sharad Pawar | "साडेतीन जिल्ह्यांचे नेते.." पडळकरांची शरद पवारांवर जहरी टीका

Raj Thackeray: २० वर्षांनी 'राज'योग! ठाकरे-नारायण राणे २ दशकांनंतर एकाच व्यासपीठावर

SCROLL FOR NEXT