Sunil Tatkare - Ajit Pawar, maharashtra Politics SAAM TV
मुंबई/पुणे

Maharashtra Politics : अजितदादांच्या राष्ट्रवादीत मोठे चेहरे येणार; सुनील तटकरे नेमकं काय म्हणाले? पाहा व्हिडिओ

Maharashtra Political News :अजितदादांच्या राष्ट्रवादीत मोठे चेहरे येणार असल्याचा अप्रत्यक्ष दावा सुनील तटकरे यांनी केला आहे. तटकरे यांच्या वक्त्यव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

Vishal Gangurde

रुपाली बडवे, साम टीव्ही प्रतिनिधी

मुंबई : आगामी विधानसा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीनेही बैठकांचा सपाटा लावला आहे. पक्षातील नेत्यांनी मतदारसंघावर दावे देखील केले आहेत. तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी महायुतीत खिंडार पडणार असल्याचा दावा केला आहे. महविकास आघाडीच्या नेत्यांचा दावा अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी खोडून टाकला आहे. तर अजितदादांच्या राष्ट्रवादीत मोठे चेहरे येणार असल्याचा अप्रत्यक्ष दावा सुनील तटकरे यांनी केला आहे.

अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी साम टीव्हीशी संवाद सांधला. यावेळी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठं वक्तव्य केलं. 'येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी चांगल्या जागा जिंकेल. तसेच महायुतीच सरकार सत्तेत येईल. अजित पवारांच्या मतदारसंघाच्या चर्चेत काही तथ्य नाही. त्यांचा मतदारसंघ कायम राहील, हे मी प्रदेशाध्यक्ष म्हणून सांगतोय. निवडणुकांच्या तोंडावर आमच्याकडे देखील पक्षप्रवेश होणार असल्याचे राष्ट्रवादीच्या खासदार सुनील तटकरे यांनी सांगितले.

सुनील तटकरे नेमकं काय म्हणाले?

'साम टीव्हीच्या लाडक्या बाप्पाचं दर्शन घेताना राज्यातील बळीराजा आणि भगिनींसाठी प्रार्थना केली. या नवीन योजना सरकारने केल्या आहेत. या योजनेसाठी सातत्याने केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला होता, असेही त्यांनी सांगितलं.

लाडकी बहीण योजनेच्या श्रेयवादावर भाष्य करताना तटकरे म्हणाले, 'या योजनेचं श्रेय महायुतीला जातं. आमची जनसन्मान यात्रा निघाली होती. मुख्यमंत्री शिंदे यांचेही अनेक वेगवेगळे कार्यक्रम असतात. त्यांच्या पक्षाचे कार्यक्रम वर्षभर सुरु असतात. अनेक पक्ष त्यांच्या पक्षाचा विस्तार करतात. आम्ही तिन्ही पक्ष एकत्र आहोत. आगामी विधानसभा निवडणुकीला महायुती म्हणून सामोरे जाणार आहोत, असे त्यांनी सांगितले.

'राष्ट्रवादीचा मार्ग खडतर नाही, तर सुसाट सुरु आहे. लोकसभेत तिन्ही पक्षाचं सामंजस्य घडवण्यात आम्हाला अपयश आलं. राज्य पातळीवर एकत्र बसलो. मात्र, जिल्हा, तालुका पातळीवर सामंजस्य घडवण्यात यश आलं नाही. अपयश आलं, त्याची काही कारणे आहेत. त्यात समन्वयाचा अभाव हे एक कारण आहे. आता आम्ही सर्वांनी ठरवलं की, विधानसभेला ताकदीने सामोरे जायचं आहे. ताकदीने एकमताने निवडून जायचं आहे, असं ठरवलं आहे, असे तटकरे पुढे म्हणाले. a

मित्रपक्षांतील नेत्यांच्या वक्तव्यावर भाष्य करताना तटकरे म्हणाले, 'महायुतीचं घर भरलेलं आहे. उद्या अधिक भरलेलं राहील. एका दोघांच्या वक्तव्याने काही परिणाम होणार नाही. आम्ही सतर्क आहोत. मेगाभरती वगैरे काही नाही. काही दिवसांनी उलट्या दिशेने प्रवास पाहायला मिळेल. लोकसभेत यश आलं. याचा अर्थ चंद्र हाताला लागला, या आविर्भावात काही मंडळी आहेत. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणि अनेकांना न्याय दिल्यानंतर उत्साह पाहायला मिळत आहे. त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांना टिकवण्यासाठी अशी वक्तव्ये केली जात आहेत. खरं आहे की, युती झाल्यानंतर काही मतदारसंघात उमेदवारी नाही मिळाल्यावर एखादा व्यक्ती महाविकास आघाडीत जाऊ शकतो. राज्यात पुन्हा महायुती सत्तेत येईल'.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT