NCP Resignation  Saam tv
मुंबई/पुणे

सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का; ऐन निवडणुकीत बड्या नेत्याचा राजीनामा

NCP Resignation : सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसलाय. बड्या नेत्याने ऐन निवडणुकीत पक्षातील पदाचा राजीनामा दिला आहे.

Vishal Gangurde

पुण्यात विधानपरिषदेच्या निवडणुकीमुळे राजकीय घडामोडींना वेग

राष्ट्रवादी काँग्रेसकडून विक्रम काकडे यांंना पुण्यात उमेदवारी

टिंगरे यांना उमेदवारी डावलल्याने बड्या नेत्याचा राजीनामा

पुणे : राज्यात विधानपरिषदेच्या १७ जागांवर निवडणुका होत आहेत. या निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. भाजपने काल ११ उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यानंतर आज सोमवारी सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही उमेदवार जाहीर केलेत. परंतु महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीत पुण्यातील विधानपरिषदेच्या जागेवरून हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. पुण्यातील जागेवर भाजपमधून राष्ट्रवादीत आलेल्या विक्रम काकडे यांना उमेदवारी देण्यात आली. या उमेवदारीवरून नाराज होत राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याने राजीनामा दिला.

पुण्यात विधानपरिषदेच्या उमेवदारीवरून नाराजीनाट्य पाहायला मिळत आहे. पुण्यात विधानपरिषदेच्या उमेदवारीसाठी माजी राज्यसभा खासदार संजय काकडे आणि विक्रम काकडे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या विक्रम काकडे यांना सुनेत्रा पवारांनी विधानपरिषदेची उमेदवारी दिली. पुण्यातील विधानपरिषदेच्या जागेसाठी सुनील टिंगरे हे इच्छुक होते. परंतु ऐनवेळी पक्षाने विक्रम काकडे यांना अधिकृत उमेदवारी दिली. त्यामुळे सुनील टिंगरे यांना डमी अर्ज भरल्याचे बोलले जात आहे.

आता विधानपरिषदेच्या उमेदवारीवरून सुनील टिंगरे यांच्या समर्थकांमध्ये नाराजी दिसून आली. या नाराजीनाट्यादरम्यान राष्ट्रवादीच्या पर्वती विधानसभा मतदारसंघाचे कार्याध्यक्ष रामदास गाडे पाटील यांनी पदाचा राजीनामा दिला. गाडे पाटील यांच्या राजीनाम्याने सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

टिंगरे समर्थक रामदास गाडे पाटील म्हणाले, 'निष्ठावंतांना डावलून तिकीट देण्यात आलं. आमच्या सारख्या निष्ठावंत कार्यकर्त्यांचं मन दुखावलं गेलं आहे. सुनेत्रा पवारांना दोन दिवसांपूर्वी पत्र लिहिलं होतं. त्यावेळी म्हटलं होतं की, पक्षाची वाईट अवस्था आहे. दादांच्या निधनानंतर संघटनेच्या बांधणीला उतरती कळा लागली आहे. पक्ष वाढवायचा असेल, तर निष्ठावंत कार्यकर्त्यांना उमेदवारी दिल्यास पक्ष वाढेल. परंतु आज आजच्या उमेदवारीच्या घोषणामुळे तीव्र दु:ख झालं. दादांच्या जाण्याने आम्ही कसं तोंड देत आहोत, हे आम्हालाच माहीत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: बळीराजाच्या सुख-समृद्धीसाठी डोंबिवलीत पार पडला नवकुंडात्मक सहस्रचंडी महायाग

Rajma vs Chole: राजमा की छोले, सर्वाधिक प्रोटिन कशात? उत्तर वाचून आश्चर्यचकित व्हाल

शेतजमीन खरेदीचा प्लॅन आहे का? ५ महत्त्वाचे डॉक्युमेंट्सच तपासाच; अन्यथा आयुष्यभराची कमाई बुडणार

high fiber superfoods : पोट निरोगी ठेवण्यासाठी फायदेशीर आहेत हे 7 फायबरयुक्त सुपरफूड्स

Upvasachi Batata Bhaji Recipe : नवरात्रीच्या उपवासाला बनवा दाण्याच्या कुटाची बटाट्याची भाजी, चव इतकी भन्नाट की पुन्हा पुन्हा खाल

SCROLL FOR NEXT