Mumbai Central Railway Local Train Sunday Mega Block Saam tv
मुंबई/पुणे

Sunday Mega Block : विकेंडला घराबाहेर फिरायला जात असाल तर थांबा; 'या' मार्गावर रविवारी असणार मेगा ब्लॉक, वाचा वेळापत्रक

Sunday Local Railway Mega Block : मध्य रेल्वेच्या माटुंगा–मुलुंड जलद मार्ग व हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. अनेक लोकल रद्द असून काही गाड्या उशिराने धावणार आहेत. प्रवाशांनी प्रवासाचे नियोजन करण्याचे आवाहन.

Alisha Khedekar

  • मध्य रेल्वेवर आज अभियांत्रिकी कामांसाठी मेगा ब्लॉक

  • माटुंगा–मुलुंड दरम्यान जलद लोकल धीम्या मार्गावर वळवणार

  • हार्बर मार्गावरील अनेक लोकल सेवा रद्द

  • प्रवाशांना मुख्य व पश्चिम रेल्वेवरून प्रवासाची मुभा

Mumbai Railway Local Sunday Mega Block Timetable प्रवाशांनो लक्ष द्या! तुम्ही देखील सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे फिरण्याचे प्लॅन करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी. उद्या म्हणजेच २५ जानेवारी रोजी मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड दरम्यान अप आणि डाउन जलद मार्गावर ११.०५ ते १५.४५ वाजेपर्यंत, तसेच हार्बर मार्गावर सकाळी १०.०० ते ६.०० वाजेपर्यंत अभियांत्रिकी व देखभाल कामे करण्यासाठी मेगा ब्लॉक जाहीर करण्यात आला आहे.

माटुंगा ते मुलुंड दरम्यान असा असणार मेगा ब्लॉक

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून १०.३६ ते १५.१० वाजेदरम्यान सुटणाऱ्या डाउन जलद मार्गावरील गाड्या माटुंगा स्थानक येथून डाउन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. या गाड्या माटुंगा ते मुलुंड दरम्यान त्यांच्या नियोजित थांब्यांवर थांबतील व गंतव्य स्थानकावर सुमारे १५ मिनिटे उशिराने पोहोचतील. ठाण्यापुढील जलद गाड्या मुलुंड स्थानकावरून पुन्हा डाउन जलद मार्गावर वळवण्यात येतील.

ठाणे येथून ११.०३ ते १५.३८ वाजेदरम्यान सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील गाड्या मुलुंड स्थानक येथून अप धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. या गाड्या मुलुंड ते माटुंगा दरम्यान त्यांच्या नियोजित थांब्यांवर थांबतील. त्यानंतर माटुंगा स्थानकावरून या गाड्या पुन्हा अप जलद मार्गावर वळवण्यात येतील व गंतव्य स्थानकावर सुमारे १५ मिनिटे उशिराने पोहोचतील.

हार्बर मार्गावर असा असणार मेगा ब्लॉक

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – चुनाभट्टी / बांद्रा दरम्यान डाउन हार्बर मार्गावर ११.४० ते १६.४० वाजेपर्यंत आणि चुनाभट्टी / बांद्रा – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान अप हार्बर मार्गावर ११.१० ते १६.१० वाजेपर्यंत

हार्बर मार्गावरील सेवा रद्द

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून ११.१६ ते १६.४७ वाजेदरम्यान वाशी / बेलापूर / पनवेलकडे जाणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा तसेच १०.४८ ते १६.४३ वाजेदरम्यान बांद्रा / गोरेगावकडे जाणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.

पनवेल / बेलापूर / वाशी स्थानक येथून ९.५३ ते १५.२० वाजेदरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा तसेच गोरेगाव / बांद्रा स्थानक येथून सकाळी १०.४५ ते सायंकाळी १७.१३ वाजेदरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. ब्लॉक कालावधीत पनवेल आणि कुर्ला दरम्यान विशेष सेवा २० मिनिटांच्या अंतराने चालविण्यात येणार आहेत.

ब्लॉक कालावधीत हार्बर मार्गावरील प्रवाशांना १०.०० ते १८.०० वाजेपर्यंत मुख्य मार्ग व पश्चिम रेल्वे मार्गावरून प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी हे देखभाल मेगा ब्लॉक अत्यावश्यक आहेत. प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाने दिलगीर व्यक्त केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: बदलापूरच्या घटनेनंतर 'प्री प्रायमरी' शाळा शासनाच्या अखत्यारीत आणणार

Masale Bhaat: नेहमीच्या मसाले भाताला द्या कोल्हापूरी तडका; ही ट्रिक एकदा वापरुनच बघा

Trendy Cotton Clothes: ट्रेंडी अन् स्टायलिश कॉटन कपड्याचे कलेक्शन, महिलांसाठी ठरतील बेस्ट

Winter Saree Fashion : थंडीला टाटा बाय-बाय! स्वेटरसोबत 'अशी' स्टाइल करा साडी, तुमच्या ग्लॅमरस लूकवरून नजर हटणार नाही

Dry fruits Halwa : शरीराला ताकद मिळेल एकदा करुनच बघा पौष्टिक ड्रायफ्रुट्स हलवा, नोट करा रेसिपी

SCROLL FOR NEXT