Sunday Railway Mega Block Schedule Saam Tv
मुंबई/पुणे

Sunday Mega Block : रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी, रविवारी मध्य अन् ट्रान्स हार्बर मार्गावर मेगाब्लॉक, वाचा वेळापत्रक

Sunday Railway Mega Block Time Table : मध्य रेल्वेने ट्रान्स हार्बर मार्गावर ठाणे ते वाशी, नेरुळदरम्यान मेगाब्लॉक जाहीर केला आहे. रविवारी अनेक लोकल गाड्या रद्द राहणार असून प्रवाशांनी नियोजन करून प्रवास करावा.

Alisha Khedekar

  • ट्रान्स हार्बर मार्गावर मेगाब्लॉक जाहीर

  • ठाणे, वाशी, नेरुळ दरम्यान सेवा रद्द

  • सकाळी ११.१० ते ४.१० वेळेत परिणाम

  • प्रवाशांनी नियोजन करून घराबाहेर पाडण्याचे आवाहन

Sunday Railway Mega Block Schedule प्रवाशांनो लागोपाठ आलेल्या सुट्टीचा आनंद घेण्यासाठी येत्या रविवारी लोकलने प्रवास करणार असाल तर थांबा आधी ही बातमी वाचा. उद्या म्हणजेच २२ मार्च रोजी रविवारी मध्य रेल्वेने विविध अभियांत्रिकी आणि देखभाल-दुरुस्तीची कामे पार पाडण्यासाठी ठाणे आणि वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ‘ट्रान्स हार्बर’ मार्गावर मेगा ब्लॉक राबवणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी नियोजन करून घराबाहेर पाडण्याचे आवाहन रेल्वेद्वारे करण्यात आले आहे.

मध्य रेल्वेने जारी केलेल्या परिपत्रकानुसार, रविवारी २२ मार्च रोजी ट्रान्स-हार्बर मार्गावरील ठाणे आणि वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन मार्गावर सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. ठाणे येथून १०.३५ ते १६.०७ वाजेपर्यंत वाशी, नेरुळ आणि पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या डाऊन मार्गावरील लोकल आणि पनवेल, नेरुळ, वाशी येथून १०.२५ ते १६.०९ वाजेपर्यंत ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या अप मार्गावरील सेवा रद्द राहतील.

विद्याविहार येथून ०४.४५ वाजता सुटणाऱ्या ते ०९.०५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या सेवा मुलुंड स्थानकावर 'डाऊन जलद' मार्गावर वळवण्यात येतील आणि पुढे ठाणे स्थानकावर पुन्हा 'डाऊन धीम्या' मार्गावर वळवण्यात येतील. याव्यतिरिक्त, काही 'डाऊन धीम्या' सेवा दिवा स्थानकावर 'डाऊन जलद' मार्गावर वळवण्यात येतील आणि त्या कोपर व ठाकुर्ली स्थानकांवर थांबणार नाहीत.

दिनांक २१ मार्च रोजी २३.२६ ते २३.५२ या वेळेत आणि २२ मार्च रोजी ०३.२३ ते ०९.५५ या वेळेत कल्याण येथून सुटणाऱ्या 'अप धीम्या' मार्गावरील गाड्यांना कल्याण येथे 'अप जलद' मार्गावर वळवण्यात येतील; त्यामुळे या गाड्या ठाकुर्ली आणि कोपर स्थानकांवर थांबणार नाहीत. पुढे दिवा आणि ठाणे स्थानकांदरम्यान या गाड्यांना पुन्हा 'अप धीम्या' मार्गावर वळवण्यात येईल. तसेच, ठाणे आणि मुलुंड स्थानकांदरम्यान 'अप धीम्या' मार्गावरील पुढील गाड्यांना 'अप जलद' मार्गावर वळवण्यात येईल.

ब्लॉक कालावधीत अप आणि डाऊन जलद गाड्या त्यांच्या नियोजित थांब्यांव्यतिरिक्त कळवा, मुंब्रा आणि दिवा या स्थानकांवरही थांबतील. २२ मार्च रोजी डोंबिवली येथे समाप्त होणाऱ्या किंवा तिथूनच सुरू होणाऱ्या सर्व गाड्या रद्द राहतील. ब्लॉक कालावधीत, मुलुंड-ठाणे आणि दिवा-कल्याण या स्थानकांदरम्यानच्या 'अप' आणि 'डाऊन' दिशेकडील सर्व उपनगरीय गाड्या रद्द राहतील. ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस/दादर येथून सुटणाऱ्या 'डाऊन' मेल आणि एक्सप्रेस गाड्यांना विद्याविहार,ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यानच्या ५ व्या मार्गावरून वळवण्यात येईल. पायाभूत सुविधांची देखभाल आणि सुरक्षिततेसाठी हे 'मेगा ब्लॉक' अत्यंत आवश्यक आहेत. यामुळे प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासन दिलगीरी व्यक्त केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: तळा येथील लक्ष्मी नारायण मंदिराच जिर्णोद्धार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा

फटाक्यांच्या फॅक्टरीत अग्नितांडव; १३ जणांचा मृत्यू, स्थानिकांची मदतीसाठी धावाधाव

100 रिक्षांना हात दाखवला तरी एकही थांबली नाही; लेकाला कडेवर घेऊन बाप दीड तास उभा, मनसेचे माजी आमदार संतापले

Maharashtra Politics: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी भाजप-राष्ट्रवादी आमनेसामने; भूमिपूजनावरून आजी - माजी आमदार भिडले

Shiv Thakare: कॉलेजमधलं प्रेम, ९ वर्ष रिलेशनशिपमध्ये होता पण..., ब्रेकअप का झाला? शिव ठाकरेचा मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT