Covid Center Scam Saam Tv
मुंबई/पुणे

Covid Center Scam: BMC कोविड घोटाळा प्रकरणी ईडीची मोठी कारवाई; संजय राऊतांच्या 2 निकटवर्तीयांना अटक

Mumbai News: मुंबईतील कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी ईडीने मोठी कारवाई केली आहे.

Shivani Tichkule

संजय गाड

Mumbai BMC News: मुंबईतील कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी ईडीने मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणी ईडीने दोन आरोपींना अटक केली आहे. अटक करण्यात आलेले आरोपी हे संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या जवळचे असायचे बोलले जात आहे. सुजित पाटकर आणि डॉक्टर किशोर बिसुरे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यामुळे ठाकरे गटात खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

किशोर बिसुरे हे बीएमसीचे डॉक्टर आहेत, तसंच दहिसर कोविड फील्ड हॉस्पिटलचे डीन होते. दहिसर कोविड फील्ड हॉस्पिटलचा करार सुजित पाटकर यांच्या लाइफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंटशी करण्यात आला होता अशी माहिती आहे.

या दोघांना आज कोर्टात हजर करण्यात येणार आहे. भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी सुजित पाटकर यांच्यावर 100 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप केला होता. त्या प्रकरणाची ईडीने (ED) दखल चौकशी केली होती. सुजीत पाटकर यांची अनेकदा चौकशीही केली होती. तसेच त्यांच्या घरावर छापेमारीही केली होती. त्यानतंर अखेर त्यांना आज अटक करण्यात आली आहे.

मुंबई महापालिकेच्या (BMC) जम्बो कोविड सेंटर घोटाळा प्रकरणात ईडीचा तपास सुरू आहे. ईडीने मुंबईत अनेक ठिकाणी धाडी टाकल्या होत्या. महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी यात असल्याचे झाडाझडतीत समोर आले आहे. या कथित घोटाळ्याची व्याप्ती वाढत असून, तपासात अनेक धक्कादायक बाबी उघड होत आहेत. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra School Holiday: राज्यातील शाळांना उन्हाळी सुट्टी कधीपासून आणि किती दिवस असणार? शिक्षण विभागाकडून वेळापत्रक जाहीर

माईकची तोडफोड, फाईल्स फेकल्या; प्रदुषणाच्या चर्चेवेळी महानगरपालिकेत नगरसेवकांमध्ये तुफान हाणामारी

जिथून निवडून आले तिथे जनतेसाठी काम करा; पुढील 30 वर्ष...; अमित शाह यांची भविष्यवाणी, राहुल गांधींनाही दिला सल्ला|VIDEO

जरांगेंचा ५०० कोटींचा ऑडिओ बॉम्ब, ती महिला कोण? श्रीकांत शिंदे अन् भाजपच्या २ आमदारांची नावं घेतली? शिंदेसेनेच्या नेत्यांनी फडणवीसांना काय सांगितलं?

काँग्रेस आमदारचा भीषण अपघात; MLAच्या कारची इलेक्ट्रिक स्कूटरला जोरदार धडक

SCROLL FOR NEXT