vijay wadettiwar vs sudhir mungantiwar :  Saam tv
मुंबई/पुणे

महापौरपदावरून ट्विस्ट ! भाजपचे नगरसेवक काँग्रेसच्या संपर्कात; वडेट्टीवारांचा दावा, सुधीर मुनगंटीवार म्हणाले...

vijay wadettiwar vs sudhir mungantiwar : भाजपचे नगरसेवक काँग्रेसच्या संपर्कात असल्याचा दावा वडेट्टीवार यांनी केला आहे. त्यावर मुनगंटीवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

संजय तुमराम, साम टीव्ही, चंद्रपूर

चंद्रपुरात महापौरपदावरून ट्विस्ट

भाजपचे नगरसेवक आमच्या संपर्कात - वडेट्टीवार

वडेट्टीवार यांच्या दाव्यावर मुनगंटीवार यांचं प्रत्युत्तर

चंद्रपूर : भाजपचे नगरसेवक आमच्या संपर्कात आहेत, असा दावा काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केल्यावर सुधीर मुनगंटीवार यांनीही प्रत्युत्तर दिलं आहे. 'काँग्रेसचा दावा योग्य आहे. आमचे नगरसेवक त्यांच्या नगरसेवकांच्या संपर्कात आहेत. भाजपचा महापौर बनवण्यासाठी काँग्रेस नगरसेवकांना आमचे नगरसेवक आग्रह करीत आहेत. विकास करायचा असेल, निधी आणायचा असेल, तर भाजपबरोबर गेले पाहिजे, अशी काँग्रेस नगरसेवकांची इच्छा आहे. पण ते बंदिस्त असल्याने आता येऊ शकत नाही. मात्र योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ, अशी भूमिका काँग्रेस नगरसेवकांनी आमच्याकडे व्यक्त केली. हा संपर्क दूरध्वनीवरून सुरू आहे, अशी माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

विकास केवळ भाजप करू शकते : मुनगंटीवार

मुनगंटीवार पुढे म्हणाले, 'बहुमत कुणाकडे आहे, याचा संभ्रम जनतेमध्ये असला तरी विकास केवळ भाजपच करू शकते, यावर लोकांचे एकमत आहे. राज्यात आणि केंद्रात भाजपची सत्ता आहे. मनपा स्वबळावर विकास करू शकेल, अशी स्थिती नाही. त्यासाठी राज्य आणि केंद्राकडून निधी आणावा लागतो. काँग्रेसची सत्ता असलेल्या गावांत आज काय स्थिती आहे, ती एकदा बघा'.

महापौराच्या रोस्टरवर मुनगंटीवार काय म्हणाले?

'महापौर पदाचे रोस्टर निघाल्यावर स्थिती आणखी स्पष्ट होईल. सर्वांनाच महापौर बनायची इच्छा असल्याने सगळेच सध्या मेहनत घेत आहेत. महापौर झाला तर तो भाजपचाच होईल, अन्यथा विरोधात बसू, या मतावर मी ठाम आहे. काँग्रेसचा महापौर झाल्यास विकास होईल का, असा प्रश्न त्यांनी केला.

बोलण्याची जबाबदारी माझ्यावर - मुनगंटीवार

'चंद्रपुरात भाजपची सत्ता यावी, यासाठी आम्ही सर्वच प्रयत्न करीत आहोत. बोलण्याची जबाबदारी माझ्याकडे दिल्याने मी यावर बोलतो. मी पुन्हा एकदा सांगतो की, भाजपचा महापौर बनवण्यासाठी आमचे नगरसेवक काँग्रेस नगरसेवकांच्या संपर्कात आहेत, असा टोला त्यांनी वडेट्टीवारांना लगावला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: दिघा विभागात तलवार घेऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न

Hair Care: केस नॅचरली हेल्दी आणि शायनी हवेत? मग सुट्टीच्या दिवशी 'हा' घरी बनवलेला हेअर मास्क नक्की लावा

Maharashtra Politics: मराठी महापौरच झाला पाहिजे, परप्रांतीय महापौर केला तर उग्र आंदोलन; कुणी दिला इशारा?

Wednesday Horoscope: राजकारण्यांसाठी उत्तम दिवस, काहींना महत्वाच्या कामात अडथळे, ४ राशींची चांदी; वाचा बुधवारचे राशीभविष्य

अकोल्याच्या राजकारणात मोठा ट्विस्ट; भाजपच्या उमेदवाराला काँग्रेस आणि MIM चा पाठिंबा?

SCROLL FOR NEXT