Success Story Saam Tv
मुंबई/पुणे

Success Story: पोरानं बापाचे नाव मोठं केलं,फक्त २० व्या वर्षी पायलट झाला, अंबरनाथच्या लेकाची ठाण्यात चर्चा

Success Story Of Pilot Jatin Umesh Patil: अंबरनाथचा जतीन उमेश पाटील हा तरुण २० व्या वर्षीच पायलट झाला आहे. त्याने खूप कमी वयात हे यश मिळवले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अजय दुधाणे, साम टीव्ही प्रतिनिधी

प्रत्येकाची काही न काही स्वप्ने असतात. स्वप्नं पूर्ण करण्यासाठी मेहनत ही करावीच लागते. मोठं होऊन प्रत्येकालाच काही न काही व्हायचे असतं. असंच स्वप्न अंबरनाथच्या जतीन उमेश पाटीलचं होतं. त्याला लहानपणापासूनच पायलट व्हायचे होते. त्याने त्याचे स्वप्न पूर्ण केलंय. तो अवघ्या २०व्या वर्षी पायलट झालाय.तो ठाण्यातील सर्वात लहान पायलट झालाय.

अंबरनाथच्या कोहोजगावातील जतीन उमेश पाटील यानं ठाणे जिल्ह्यातील सर्वात तरुण पायलट होण्याचा मान पटकावलाय. जतीनने वयाच्या २० व्या वर्षी वैमानिकाचं प्रशिक्षण पूर्ण केलंय. या कामगिरीबद्दल त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय.

जतीन हा अंबरनाथच्या कोहोजगावातील रहिवासी आणि माजी नगरसेवक उमेश पाटील यांचा मुलगा आहे. लहानपणापासूनच त्यानं पायलट होण्याचं स्वप्न उराशी बाळगलं होतं. कुटुंबीयांनी दिलेली भक्कम साथ आणि जिद्दीच्या जोरावर जतीनने वैमानिक प्रशिक्षण अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केला. विशेष म्हणजे ठाणे जिल्ह्यातील सर्वात तरुण पायलट होण्याचा मानही त्याने पटकावला. जतीनच्या यशामुळे त्याचे कुटुंबीय भारावून गेले आहेत. इतक्या लहान वयात त्याने घेतलेली गरुड झेप निश्चितच कौतुकास्पद आहे. सोशल मीडियातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय.

अंबरनाथच्या जतीन यांचे पायलट होण्याचेच स्वप्न होतं. जतीनने खूप लहानपणापासूनच मेहनत घेतली. अभ्यास केला आणि स्वतः ला पायलट होण्यासाठी तयार केले. तो अवघ्या २०व्या वर्षीच पायलट झाला आहे. त्याचे हे यश खूप जास्त कौतुकास्पद आहे. त्याच्या या यशाचे सर्वांनाच कौतुक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT