School Reopen  saam tv
मुंबई/पुणे

विद्यार्थांच्या 1 महिन्याच्या सुट्ट्या रद्द; उन्हाळ्यातही भरणार शाळा, पाहा Video

कोरोना मुळे शालेय विद्यार्थ्यांचं झालेले नुकसान भरून काढण्यासाठी शिक्षण विभागाने मोठा निर्णय घेतला आहे.

अश्विनी जाधव - केदारी

पुणे: कोरोना मुळे शालेय विद्यार्थ्यांचं झालेले नुकसान भरून काढण्यासाठी शिक्षण विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी आता उन्हाळ्याच्या एकूण सुट्ट्यामधील एका महिन्याच्या सुट्ट्या रद्द करुन एप्रिल महिन्यातही पूर्णवेळ वर्ग सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांकडूनही मागणी करण्यात आली होती. त्यानुसार एप्रिल महिना आणि रविवारीही शाळा सुरु राहणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचं वार्षीक नुकसान होऊ नये यासाठी शिक्षण विभागाकडून (Education Department) मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

यंदा मात्र विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या सुट्टीत फक्त अभ्यासच करावा लागणार आहे. काही पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी मात्र या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. एप्रिल आणि मे महिन्यांत कडक ऊन असतं, त्याचा त्रास मुलांना होऊ शकतो तसेच काहींचं गावी जाण्याचं बुकिंग ही झालंय शिक्षण विभागाच्या या निर्णयामुळे नुकसान होणार असल्याची टीका पालकांनी केली आहे.

दरम्यान कोरोना काळात गेल्या तीन वर्षांपासून शाळा- महाविद्यालये कधी ऑफलाईन तर कधी ऑनलाईन सुरु होती. परंतु मागच्या आठवड्यात शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी १०० टक्के शाळा सुरु करण्याचे आदेश काढले. त्यानंतर राज्यभरातील सर्व ठिकाणी शाळा १०० टक्के क्षमतेने सुरु झाल्या आहेत. गेल्या दोन वर्षापासून विद्यार्थी सुट्ट्यांचा अनुभव घेत आहेत. त्यामुळे काहींनी या निर्णयाचं स्वागत केले आहे तर काही लोकांनी विरोध केला आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs AUS, Playing XI: रोहितचा पर्याय सापडला! पर्थ कसोटीसाठी टीम इंडिया या 11 खेळाडूंसह उतरणार मैदानात

Nashik News : मोठी बातमी! नाशिकमध्ये ५ कोटींचं घबाड सापडलं, नेत्यासह गाडीही ताब्यात

Maharashtra News Live Updates: पुण्यात सुप्रिया सुळे यांच्या बॅगांची तपासणी

Night Skin Care: झोपण्यापूर्वी चेहऱ्याला लावा किचनमधील 'या' गोष्टी; सकाळी मोत्याप्रमाणे चमकेल चेहरा

Rajesh Pawar News : भाजप आमदाराची सभा गावकऱ्यांनी उधळली! राजेश पवार यांच्या सभेत गोंधळ | VIDEO

SCROLL FOR NEXT