KDMC Stray Dogs issue saam tv
मुंबई/पुणे

Kalyan : धक्कादायक! साडेपाच वर्षांत 1.12 लाख नागरिकांना भटक्या कुत्र्यांचा चावा, कल्याण-डोंबिवलीकरांनी घेतला धसका

kdmc stray dog attacks dog bite cases five years : केडीएमसी क्षेत्रात साडेपाच वर्षांत १ लाख १२ हजार नागरिकांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतल्याची आकडेवारी समोर आली आहे. ५ कोटींहून अधिक खर्च करूनही कुत्र्यांची संख्या वाढत असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

Nandkumar Joshi

संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही | कल्याण

कल्याण-डोंबिवली महापालिका (KDMC) क्षेत्रात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या साडेपाच वर्षांत तब्बल १ लाख १२ हजार १११ नागरिकांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. एकीकडे कुत्र्यांच्या निर्बीजीकरणासाठी पालिकेकडून कोट्यवधी रुपये खर्च केले जात असताना दुसरीकडे भटक्या कुत्र्यांची संख्या आणि श्वानदंशाच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने पालिकेच्या उपाययोजनांवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्राची लोकसंख्या सुमारे २० ते २५ लाख आहे. आजमितीला या परिसरात तब्बल ८० हजार भटके कुत्रे असल्याचे सांगितले जात आहे. जानेवारी २०२१ ते जून २०२६ या कालावधीत १ लाख १२ हजार १११ नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतला आहे. म्हणजेच दरवर्षी मोठ्या संख्येने नागरिकांना भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्याला सामोरे जावे लागत आहे.

भटक्या कुत्र्यांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी आणि त्यांचे निर्बिजीकरण करण्यासाठी केडीएमसीने या कालावधीत तब्बल ५ कोटी ३४ लाख ३७ हजार ७६० रुपये खर्च केले आहेत. मात्र एवढा मोठा निधी खर्च करूनही पालिका क्षेत्रातील भटक्या कुत्र्यांची संख्या कमी होण्याऐवजी वाढत असल्याचे चित्र आहे.

विशेष म्हणजे, गेल्या काही दिवसांत कल्याण पश्चिमेतील खडकपाडा आणि स्टेशन परिसरासह विविध भागांत भटक्या कुत्र्यांनी नागरिकांवर हल्ले केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत अनेकांना कुत्र्यांच्या हल्ल्याची भीती सतावत आहे.

कोट्यवधी रुपये खर्च करूनही भटक्या कुत्र्यांचा प्रश्न सुटत नसेल, तर निर्बीजीकरणाची प्रक्रिया नेमकी किती प्रभावीपणे राबवली जात आहे? निर्बीजीकरण झालेल्या कुत्र्यांची संख्या, त्यानंतरची देखरेख आणि प्रत्यक्षात कुत्र्यांची संख्या किती कमी झाली, याचा पालिका प्रशासनाने हिशोब देण्याची मागणी आता नागरिकांकडून होत आहे.

कोट्यवधी रुपये खर्च करूनही भटक्या कुत्र्यांचा प्रश्न सुटत नसेल, तर निर्बीजीकरणाची प्रक्रिया नेमकी किती प्रभावीपणे राबवली जात आहे? निर्बीजीकरण झालेल्या कुत्र्यांची संख्या, त्यानंतरची देखरेख आणि प्रत्यक्षात कुत्र्यांची संख्या किती कमी झाली, याचा पालिका प्रशासनाने हिशोब देण्याची मागणी आता नागरिकांकडून होत आहे.

भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला असून, केडीएमसी प्रशासन या समस्येवर ठोस आणि कायमस्वरूपी उपाययोजना कधी करणार, असा सवाल आता कल्याण-डोंबिवलीकरांकडून उपस्थित केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Foundation According Skin Type: स्किन टाइपनुसार निवडा परफेक्ट फाउंडेशन; मेकअप दिसेल परफेक्ट आणि ग्लोइंग

Maharashtra News Live Update: गोकुळ दूध संघातील माजी संचालकांना सहकार विभागाचा दणका

... तर दोन मंत्री राजीनामा देतील, मित्रपक्षाचा मुख्यमंत्र्यांना इशारा; राजकारणात खळबळ

Tuesday Horoscope : उद्या नशीब देणार साथ की अडचणी वाढणार? वाचा मंगळवारचे राशीभविष्य

Fruit Benefits : तुमच्या रक्तातील पेशी कमी होतायत? 'ही' ६ फळे दररोज खा; २ दिवसांत दिसेल रिझल्ट

SCROLL FOR NEXT