manda mhatre  SaamTv
मुंबई/पुणे

नवी मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचार थांबवा आ. मंदा म्हात्रे यांची आयुक्तांकडे मागणी

आयुक्तांनी तातडीने पालिकेतील भ्रष्ट अधिकाऱ्यांना चाप लावावा, अशी मागणी बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी आयुक्तांना पत्र देऊन दिला आहे.

विकास मिरगणे

नवी मुंबई : पालिका आस्थापनेत वारंवार भ्रष्टाचाराच्या घटना उघडकीस येत आहेत. नुकतेच बेलापूर विभाग कार्यालयातील दोन अधिकारी व कोपरखैरणे विभाग कार्यालयातील एलबीटी अधिकारी यांना लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. ही अतिशय गंभीर घटना असून संपूर्ण राज्यात नवी मुंबई पालिकेचे नाव मलीन झाले आहे. पालिकेच्या आरोग्य विभाग, शिक्षण विभाग, उद्यान विभाग, वाहन विभाग तसेच इतर अनेक विभागांतील भ्रष्टाचाराबाबत अनेक वेळा निवेदनाद्वारे कळवले आहे.

मात्र, आयुक्तांना अद्यापही भ्रष्टाचार थांबवता आलेला नाही. आयुक्तांनी तातडीने पालिकेतील भ्रष्ट अधिकाऱ्यांना चाप लावावा, अशी मागणी बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी आयुक्तांना पत्र देऊन दिला आहे.

हे देखील पहा :

पालिकेची प्रतिमा सुधारा :

सध्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाई होत आहे. परंतु असे किती तरी भ्रष्टाचारी अधिकारी महापालिका आस्थापनेत कार्यरत आहेत. याचा उलगडा होणे कठीण आहे. संपूर्ण राज्यात नवी मुंबई महानगरपालिकेचा नावलौकिक असताना कामांमध्ये पारदर्शकता असणे आवश्यक आहे.

मी वारंवार मागणी केलेल्या भ्रष्टाचाराची पुन्हा उच्चस्तरीय चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर वेळीच कारवाई केल्यास यापुढे होणाऱ्या भ्रष्टाचारास आळा बसू शकेल. नवी मुंबई पालिकेत वारवार होणाऱ्या भ्रष्टाचाराला आळा घालण्याकरिता ठोस उपाययोजना करण्यात याव्यात. तसेच दोषी अधिकाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई करून पालिकेची प्रतिमा सुधारावी, अशी मागणी मंदा म्हात्रे यांनी आयुक्तांकडे केली आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

TET Exam: आनंदाची बातमी! शिक्षकांची TET परीक्षेतून सुटका; विजय सरकारचा मोठा निर्णय

जनगणनेत OBC प्रवर्ग का नाही? राहुल गांधींचा पत्रातून पंतप्रधानांना सवाल

मराठी सक्तीला भाजपचा विरोध? मराठीची सक्ती, UP निवडणुकीची भिती?

Maharashtra News Live Update: कांद्याचे भाव पाडण्याचा डाव,दिल्लीला कांदा पाठवण्यास शेतकरी संघटनेचा तीव्र विरोध

Politics: भाजपचा 'एकला चलो'चा नारा, मित्र पक्षासोबत युती तोडली; राजकारणात खळबळ

SCROLL FOR NEXT