RSS Saam
मुंबई/पुणे

Dombivali News: RSSच्या शाखेवर कुणी केली दगडफेक? पोलिसांना मोठा पुरावा हाती लागला, ५ जण ताब्यात

RSS Veer Savarkar Branch: आरएसएसच्या वीर सावरकर शाखेवर दगडफेक करण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी ५ जणांना ताब्यात घेतलं.

Bhagyashree Kamble

डोंबिवलीत चौधरी वाडा मैदानात आरएसएसच्या वीर सावरकर शाखेवर दगडफेक करण्यात आली होती. रात्रीच्या सुमारास काही लहान मुलं शाखेत प्रशिक्षण घेत होते. यादरम्यान काही अज्ञातांकडून वीर सावरकर शाखेवर दगडफेक करण्यात आली होती. पोलिसांनी तपास करून ५ जणांना ताब्यात घेतलं आहे. यामधील ४ जण अल्पवयीन असल्याची माहिती आहे.

डोंबिवली पूर्वेतील चौधरीवाडा मैदानावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वीर सावरकर शाखा आहे. या शाखेत काही मुलांना प्रशिक्षण देण्यात येत होते. ९ मार्चला काही अज्ञातांनी प्रशिक्षण कार्यक्रम सुरू असताना शाखेवर दगडफेक केली. जंगलातून आणि शेजारील इमारतीतून काही अज्ञातांनी दगडफेक केल्याची माहिती आहे.

दगडफेकीनंतर काही लहान मुले घाबरले होते. त्यांनी पोलीस ठाण्यात यासंदर्भात तक्रार दाखल केली. पोलिसांनी सीसीटीव्ही तपासले. सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी ५ जणांना ताब्यात घेतले. यामधील चार जण अल्पवयीन असल्याची माहिती समोर आली आहे.

दगडफेकीनंतर आरएसएसचे कार्यकर्ते संतापले. आरएसएसच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन केले. या घटनेनंतर पोलिसांनी शाखेबाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Operation Tiger : ओमराजे निंबाळकर ठाकरेंच्या शिवसेनेत परतणार? आदित्य ठाकरेंच्या विधानाने राजकीय खळबळ

MUMBAI Local : मुंबईकरांसाठी मोठी बातमी! लोकलवर कोणताही ब्लॉक नाही, ट्रेन रद्द नाहीत, पाहा अपडेट

Maharashtra Weather : मोठी बातमी! पुढील ३ दिवसांत पावसाची शक्यता, हवामान विभागाने दिली महत्त्वाची अपडेट

Pune Fort : सह्याद्रीतील दगडात कोरलेला अद्भुत किल्ला, पुण्यातील ‘हे’ ठिकाण जपतेय इतिहासाचा वारसा

Cocktail 2 Collection : 'कॉकटेल २' फ्लॉप की हिट? रश्मिका-शाहिद-कृतीच्या 'लव्ह ट्रँगल'नं दोन दिवसांत किती कोटींचा गल्ला जमावला?

SCROLL FOR NEXT