ST Strike: एसटी संपाचा तिढा अद्यापही कायम, विलीनीकरणाबाबत शुक्रवारी सुनावणी Saam Tv
मुंबई/पुणे

ST Strike: एसटी संपाचा तिढा अद्यापही कायम, विलीनीकरणाबाबत शुक्रवारी सुनावणी

सटीचे राज्यसरकारमध्ये विलीनीकरण व्हावे यासाठी वकिल गुणरत्न सदावर्ते (Advocate Gunaratna Sadavarte) यांनी याचिका दाखल केली होती.

सूरज सावंत

मुंबई : एसटीच्या विलीनीकरणाबाबतची पुढील सुनावणी शुक्रवारी होणार आहे. एसटीचे राज्यसरकारमध्ये विलीनीकरण व्हावे यासाठी वकिल गुणरत्न सदावर्ते (Advocate Gunaratna Sadavarte) यांनी याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी महामंडळाच्या वकिलांनी वेळ मागितली. त्यावर न्यायालयाने ही सुनावणी पुढे ढकलली असून आता पुढील सुनावणी शुक्रवार 25 फेब्रुवारीला होणार आहे. तुम्ही अहवाल पाहिलात का, तुम्ही अहवाल पहावा असे आमचे मत आहे , असे न्यायामूर्तींनी एसटीच्या वकिलांना सांगितले.

सरकारी वकिलांनी आपली बाजू मांडली -

22 डिसेंबरला न्यायमूर्ती वराळे यांनी एक आदेश पारीत केला होते. यात एक मागणी सोडून सर्व मागण्यांची पूर्तता करण्यात आली होती. सरकारसोबत झालेल्या 27 बैठकीत कर्मचारी युनियनचे पदाधिकारीही होते यात पगारवाढ, घरभत्ता आणि इतर महत्वाच्या बाबींवर चर्चा सकारात्मक झाली. मात्र विलीनीकरण या एकाच मुद्यावर कर्मचारी आग्रही होते. विलीनीकरण केल्यास कर्मचार्यांना सातव्या वेतननुसार पगार द्यावा लागेल. विलीनीकरण सोडून कर्मचाऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. या अहवालासंदर्भात काही महत्वाच्या सूचना द्यावयाच्या असून उद्याची तारीख महामंडळाचे वकील नायडू यांनी न्यायमूर्तींकडे मागितली आहे.

एसटीचे राज्यसरकारमध्ये विलीनीकरण व्हावे यासाठी वकिल गुणरत्न सदावर्ते यांनी याचिका दाखल केली होती. सदावर्ते यांच्या या याचिकेवर न्यायालयाच्या आदेशानंतर त्रिसत्रीय समिती नेमून अहवाल बंद लिफाफ्यात 18 फेब्रुवारीच्या आत सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. त्यानुसार समितीने दिलेल्या वेळेच्या आत त्रिसत्रीय समिताचा अहवाल न्यायालयात बंद लिफाफ्यात सादर केला होता.

याप्रकरणी पुढील सुनावनी 22 फेब्रुवारीला ठेवण्यात आली होती. त्यानुसार आज मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) सुनावणी झाली. यावेळी 92 हजार एसटी कर्मचार्यांचे लक्ष मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाकडे लागून होते. एसटीचे राज्यशासनामध्ये विलीनीकरण करावे या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी सुरु केलेल्या संपाचा आज 109 वा दिवस आहे.

दरम्यान, या संपात 90 हून अधिककर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली आहे. कोरोना काळात याच कर्मचाऱ्यांनी मोठी जबाबदारी निभावली आहे न्यायालयाने त्याचा विचार करावा, असं वकिल गुणरत्न सदावर्ते हे न्यायालयात म्हणाले

Edited By - Nupur Uppal

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shirpur Snake Birthday Celebration : बर्थडे आहे कोब्रा नागाचा! सर्पमित्राचा सोशल मीडियावर रिल्ससाठी थिल्लरपणा, व्हिडिओ व्हायरल होताच...VIDEO

Gajkesari Rajyog: आज गुरु चंद्राच्या युतीने तयार होणार गजकेसरी राजयोग; 'या' राशींवर राहणार लक्ष्मीची कृपा

Todays Horoscope: 'या' राशींना कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळतील; वाचा साप्ताहिक राशीभविष्य

Nandgaon Accident: महादेवाचं दर्शन घेऊन परताना अपघात; ट्रॅक्टर ट्रॉली २०० फूट खोल दरीत कोसळली

Vice President Election: सी.पी. राधाकृष्णन कोण आहेत? जाणून घ्या राधाकृष्णन यांचा राजकीय प्रवास

SCROLL FOR NEXT