एसटी संपावर मेस्मा लावण्याचे शेखर चेन्ने यांचे संकेत - Saam TV
मुंबई/पुणे

#STStrike चर्चेची दारे बंद, आता कडक कारवाईशिवाय पर्याय नाही - शेखर चेन्ने

गेल्या काही आठवड्यांपासून सुरु असलेला एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटायला तयार नाही. त्यामुळे आता राज्य सरकार आक्रमक पावले टाकत आहे. एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चेन्ने यांनी 'मेस्मा' लावण्याचे संकेत दिले आहेत

Saam Tv

(सुशांत सावंत)

मुंबई : गेल्या काही आठवड्यांपासून सुरु असलेला एसटी कर्मचाऱ्यांचा संप (ST Strike) मिटायला तयार नाही. त्यामुळे आता राज्य सरकार (Maharashtra Government) आक्रमक पावले टाकत आहे. एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चेन्ने यांनी 'मेस्मा' (MESMA) लावण्याचे संकेत दिले आहेत. एसटी कर्मचारी ऐकायला तयार नसल्याने आता कडक कारवाईशिवाय पर्याय नसल्याचे चेन्ने यांनी 'साम टिव्ही'ला दिलेल्या खास मुलाखतीत सांगितले.

यावेळी बोलताना ते म्हणाले, "मेस्मा कायदा अतिशय स्पष्ठ आहे. राज्य सरकारला कायदा करण्याचे अधिकार आहेत. त्यामुळे संपाला (Strike) मेस्मा कायदा लागू शकतो. आम्ही 9 हजार लोकांचे एकाच दिवशी निलंबन केलेले नाही. राज्य सरकारने कुणावरही तात्काळ कारवाई केलेली नाही. सरकारची कर्मचाऱ्यांच्या विरोधात कोणतीही भूमिका राहिलेली नाही. सरकार नुसतं कारवाई करत आहे, अशी परिस्थिती नाही,''

चेन्ने पुढे म्हणाले, "आता जे वेतन होईल त्यात किमान 9 हजारची वाढ झालेली आहे. इतकी वाढ कधीच झालेली नव्हती. आता कडक कारवाई करण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. जे कुणी अफवा पसरवत आहेत त्याला आम्ही उत्तर देण्याची आवश्यकता नाही. मेस्मा ऍक्टमध्ये स्पष्ट म्हटलेले आहे की एसटी महामंडळ ही राज्य सरकारची सेवा आहे,''

कर्मचाऱ्यांनी अपप्रचाराला बळी पडू नये, असे आवाहन करुन ते म्हणाले, "500 कोटींपेक्षा जास्त फटका आम्हाला बसला आहे. व्हाॅट्स अॅप आणि सोशल मीडियातून चुकीच्या बातम्या पसरवल्या जात आहेत. सरकार नेहमी म्हणत आलेल आहे की तुम्ही कामावर या. काही लोकांना कारवाईबद्दल देखील चुकीचे मार्गदर्शन केले जात आहे. संपामध्ये चर्चा झाली पाहिजे. इथे ज्यांच्याशी चर्चा करतो ते नेतृत्व राहत नाही. त्यामुळे चर्चा तरी कुणाशी करायची. चर्चेची सर्व दारे बंद झालेली आहेत,''

Edited By - Amit Golwalkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: डोंबिवली रेल्वे स्टेशनवर एकादशी वारीचा पारंपरिक गजर

दारु पिऊन शिक्षकाचा शाळेतच विद्यार्थ्यांसोबत डान्स; व्हिडिओ पाहून राग अनावर होईल

Shirdi Sai Temple: विठू माऊली तू, माऊली जगाची...; आषाढीचा उत्साह शिर्डीत, फुलांनी सजले साई मंदिर

Thackeray Brothers : ठाकरेंच्या लढ्याला दक्षिणेचा पाठिंबा, थेट मुख्यमंत्र्यांनी केलं कौतुक, म्हणाले प्रेरणादायी...

Karjat Tourism : हिरव्यागार जंगलात लपलेला सुंदर धबधबा, पावसाळ्यात वीकेंड येथेच प्लान करा

SCROLL FOR NEXT