ST Bank’s annual report sparks controversy after Nathuram Godse’s photo appears on the cover. saam tv
मुंबई/पुणे

एसटी बँक नथुराम गोडसेची भक्त ? बँकेच्या वार्षिक अहवालावर झळकला फोटो

Nathuram Godse Photo On ST Bank Report : मराठा आरक्षणावरुन सातत्याने जरांगेंवर टीका करणारे गुणरत्न सदावर्ते एका अहवालावरुन वादात अडकलेत. एसटी सहकारी बँक नथुराम गोडसेची भक्त आहे का ? असा सवाल विचारला जात आहे. पाहूया एक रिपोर्ट.

Girish Nikam

  • एसटी बँकेच्या वार्षिक अहवालाच्या मुखपृष्ठावर नथुराम गोडसेचा फोटो झळकला.

  • त्यामुळे एसटी बँक गोडसेची भक्त आहे का? असा प्रश्न उपस्थित झाला.

  • या प्रकरणामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नवा वाद पेटण्याची शक्यता आहे.

हे आहे स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑपरेटिव्ह बँक म्हणजेच एसटी बँकेच्या 2024-25च्या वार्षिक अहवालाचं मुखपृष्ठ..हे मुखपृष्ठ नीट पाहा. प्रभू रामचंद्र, छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबरोबर इथे चक्क महात्मा गांधींची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेचा फोटो छापलाय..एवढंच नाही तर भाजपचे आमदार प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकरांसोबत सत्ताधारी पॅनलचे प्रमुख गुणरत्न सदावर्ते आणि त्यांच्या पत्नीचाही फोटो छापण्यात आलाय.त्यावरुन वादाचं मोहळ उठलंय.. गोडसेचा फोटो मुखपृष्ठावर छापण्यात आल्याबद्दल ठाकरे सेनेने जोरदार हल्लाबोल केलाय.

याआधीही एसटी बँकेच्या निवडणुकीत सदावर्ते पॅनलचा विजय झाला तेव्हा सदावर्ते यांनी विजयी मिरवणुकीत नथुराम गोडसेच्या नावाच्या घोषणा देण्यात आल्या होत्या. एवढंच नव्हे तर व्यासपीठावर महापुरुषांच्या फोटोबरोबर गोडसेचा फोटोही ठेऊन गोडवे गायले होते. आता बॅंकेच्या अहवालाच्या मुखपृष्ठावर थेट छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबतीने गोडसेचा फोटो झळकवलाय...या गोष्टीला त्या दोन आमदारांची, भाजपच्या नेतृत्वाची मान्यता आहे का? नथुराम गोडसेचं कौतुक, त्याचं उदात्तीकरण करण्यामागचा नक्की काय हेतू आहे ? एसटी बँक नथुराम गोडसेंची भक्त आहे का ? असे एक ना अनेक सवाल निर्माण झालेत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: रोहित आर्य एन्काऊंटर प्रकरणात मानवाधिकार आयोगाकडून चौकशीचे आदेश

Election commission : निवडणुकीची घोषणा, याद्यांचा घोळ कायम; पत्रकारांच्या प्रश्नांवर आयोगाची भंबेरी, VIDEO

Mumbai : मुंबईत मानवतेला काळिमा! १ महिन्याचे बालक कचऱ्यात फेकले; समाजाला हादरवणारी घटना

Neral Matheran Train : शिट्टीचा आवाज घुमणार! माथेरानला बिंदास्त फिरायला जा, ‘हिल क्वीन’ गुरूवारपासून धावणार

Actor Govinda: बायकोच्या 'त्या' विधानावरून अभिनेता गोविंदानं मागितली सार्वजनिक माफी, काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT