Shivneri Bus Saam Tv
मुंबई/पुणे

Shivseri Bus on Atal Setu : अटल सेतूवरुन आजपासून 'शिवनेरी' बस धावणार; टाईमटेबल काय असेल? तिकीट बुकींग कसं कराल?

प्रविण वाकचौरे

Mumbai News :

देशातील सर्वात लांब सागरी पूल अटल सेतूवरुन आजपासून एसटी महामंडळाची शिवनेरी बस धावणार आहे. शिवडी-न्हावाशेवा ब्रिजवरून पुणे-मंत्रालय, स्वारगेट-दादर शिवनेरी बस आजपासून धावणार आहे. यामुळे प्रवाशांचा वेळ २५ टक्क्यांनी कमी होणार आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सध्या प्रायोगिक तत्त्वावर पुणे-मंत्रालय बस सकाळी ६.३० आणि स्वारगेट-दादर बस सकाळी ७ वाजता सुटणार आहेत. त्यानंतर सकाळी ११ व दुपारी १ वाजता या बस मंत्रालय व दादर येथून निघतील.

त्यामुळे गर्दीच्या वेळी प्रवासाचा सुमारे एक तास वाचणार आहे. बस पुणे येथून थेट पनवेल न्हावाशेवा, शिवडीमार्गे मंत्रालय आणि दादर येथे पोहोचतील. यामुळे नागरिकांचा प्रवास वेगाने होणार आहे. (Latest News Updates)

सध्या मुंबई-पुणे मार्गावर दररोज २१० शिवनेरी बस चालवल्या जात आहेत. मुंबई-पुणे हे अंतर कापण्यासाठी सध्या जवळपास चार तास लागतात. मात्र अटल सेतू मार्गे दादर आणि कळंबोली दरम्यानचे १४ थांबे सोडून प्रवास सुलभ करण्याचे एसटी महामंडळाचे उद्दिष्ट आहे. यामुळे वेळही वाचणार आहे.

तिकीट कसं बूक कराल?

या मार्गावरुन शिवनेरीने प्रवास करण्यासाठी प्रवासी www.msrtc.gov.in आणि www.npublic.msrtcors.com या अधिकृत वेबसाइट्सद्वारे तसेच मोबाइल ॲपद्वारे ऑनलाइन तिकीट सहजपणे बुक करू शकतात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : महायुतीसाठी २०९ जागांवर अनुकूल वातावरण, शिवसेनेच्या सर्व्हेक्षणातून दावा

Maharashtra Weather: गणेश विसर्जनानंतर राज्यात पावसाची एन्ट्री! आज 'या' भागात बरसणार, हवामान खात्याचा अंदाज; वाचा सविस्तर...

Today Horoscope : जुना अबोला मिटेल,घरात उत्साहाचे वातावरण राहील; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : आज विनाकारण शत्रुत्व ओढवून घ्याल, दानधर्मासाठी खर्च कराल; वाचा तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

Fact Check : गणपतीसारख्या दिसणाऱ्या बाळाचा जन्म? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT